कच्चा बादाम गर्ल फेम अभिनेत्री अंजली अरोराच्या बॉयफ्रेंडला अटक, समोर आलं मोठं प्रकरण
कच्चा बादाम गर्ल फेम अभिनेत्री अंजली अरोराच्या बॉयफ्रेंड आकाशला पोलिसांनी केली अटक. समोर आलं मोठं कारण.

सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा बॉयफ्रेंड आकाश असून त्याला मोठ्या फसवणुकीच्या आरोपाखाली मेरठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
मेरठमधील परतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काशी टोल प्लाझावर नियमित तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एका संशयास्पद स्कॉर्पिओ वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात बसलेला आकाश हा स्वतःला माजी खासदाराशी संबंधित असल्याचे दाखवणारे पास वापरत असल्याचे आढळून आले.
बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश
पोलिसांनी आकाशकडे वाहनाची कागदपत्रे आणि ओळखपत्रांची मागणी केली असता तपासात अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. चौकशीत हे स्पष्ट झाले की, आकाश बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन चालवत होता. त्याच्याविरोधात याआधीही फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात धोखाधडीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाशसह आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या कारवाईला टोल प्लाझावर सुरू असलेल्या विशेष तपास मोहिमेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. या मोहिमेद्वारे बनावट कागदपत्रे आणि बेकायदेशीर हालचालींवर कडक कारवाई केली जात आहे.
अंजली अरोराची शिफारस पण पोलिस ठाम
आकाशच्या अटकेनंतर त्याला सोडवण्यासाठी अंजली अरोरा आणि काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिसांकडे शिफारस करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कायदेशीर कारवाई कायम ठेवली.
दरम्यान, सोशल मीडियावर अंजली अरोरा आणि आकाश यांचे जुने रोमँटिक व्हिडिओ आणि फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेचा विषय बनले आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
चाहत्यांमध्ये खळबळ
सूत्रांच्या माहितीनुसार, आकाशला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याच्या पोलीस कोठडी आणि पुढील तपासाबाबत निर्णय घेतला जाईल. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘कच्चा बादाम’ या गाण्यावरच्या व्हायरल डान्समुळे अंजली अरोरा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ती बराच काळ आकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सोशल मीडियावरून स्पष्ट होते. दोघांचे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्स याआधीही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. मात्र, या अटकेमुळे अंजलीच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
