आई 20 लाख रुपये जमा करून ठेव…माझा फोन बंद होईल…तो शेवटचा कॉल, नंतर समोर आली आपबीती…

| Updated on: Feb 06, 2023 | 4:13 PM

पीडित तरुणाच्या आईने दिलेल्या माहितीवरुन पीडित तरुणाला धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे उपनगर पोलीसांनी ज्ञानेश्वर पाटील आणि यशवंत बागूल यांच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

आई 20 लाख रुपये जमा करून ठेव...माझा फोन बंद होईल...तो शेवटचा कॉल, नंतर समोर आली आपबीती...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या विविध भागात खाजगी सावकारीला (Moneylender) कंटाळून पाच जणांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहर पोलीसांनी (Nashik Police) खाजगी सावकारांच्या विरोधात धाडसत्रही सुरू केले आहे. यामध्ये खाजगी सावकारीला कंटाळून विषप्राशन केल्याची घटना ताजी असतांना एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या तरुणाला दोघा सावकारांसह इतर साथीदारांवर नाशिक शहर पोलीसांनी गुन्हा दाखल (Nashik Crime News) केला आहे. त्यामुळे खाजगी सावकारांचा जाच अजूनही सुरूच असल्याचं समोर येत असून नाशिकमध्ये खाजगी सावकारांचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक शहर पोलीसांनी पीडित तरुणाच्या आईने दिलेल्या माहितीवरुन पीडित तरुणाला धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे उपनगर पोलीसांनी ज्ञानेश्वर पाटील आणि यशवंत बागूल यांच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

उपनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी सावकारांचा जाच अद्यापही सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये धडसत्र सुरू असतांनाही दोघा भावांनी टोकाचं पाऊल उचलल्याची घटना ताजी आहे.

हे सुद्धा वाचा

मागील आठवड्यातही नाशिकच्या सातपुर परिसरात खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वेगवेगळ्या खोली बापलेकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

नेमका प्रकार आहेत तरी काय ?
नाशिकच्या बोधलेनगर परिसरात राहणारा संदीप पाटील हा सध्या फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. यापूर्वी तो 2021 मध्ये जमीनच्या व्यवहाराचे काम करत होता. त्याकाळात त्याचे अनेक जणांशी व्यवहार होत होते. त्यामुळे अनेकांकडून त्याने पैसे घेतले होते. त्यामध्ये तो पैशांची परतफेड करू न शकल्याने त्याच्याकडे पैसे मागण्याबरोबर त्रास दिला जाऊ लागला. त्यानंतर काही संशयितांनी संदीप पाटील यांचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्या आईने केला आहे. संदीप घरी परतला असला तरी त्याच्या कुटुंबात भितीचे वातावरण आहे.

किती पैशांची मागणी ? संशयित आरोपी कुठे ?
संदीप पाटील याला धुळे येथे नेण्यात आलाचा आरोप कुटुंबाने केला आहे. यामध्ये संदीप याने आई 20 लाख रुपये जमा करून ठेव, हे माणसं प्रॉपर्टी मागत आहे. मला घेऊन जात आहे, माझा फोन बंद होईल असा दावा संदीपच्या आईने केला आहे. पाटील हे कुटुंब सावकाराच्या जाचाला कंटाळूनच नाशिकयेथे दीड वर्षांपासून आले आहे. त्यामध्ये संशयित हे खाजगी सावकार असल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे. प्रकरणातील अपहरणकर्ते सध्या फरार आहे.