Chembur Firing : धक्कादायक, भर रस्त्यात चेंबूरमध्ये बिल्डरवर गोळीबार, मध्यरात्री ऑपरेशन, आता कशी आहे प्रकृती?

"गृह विभागाला नवा गृहमंत्री द्या ही माझी मागणी आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे त्याला जबाबदार मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. मुंबई पोलिसांची स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना केली जाते आणि भर वस्तीत गोळीबार होतो, पोलिसांकडे याची माहिती नव्हती का?" असे प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत.

Chembur Firing : धक्कादायक, भर रस्त्यात चेंबूरमध्ये बिल्डरवर गोळीबार, मध्यरात्री ऑपरेशन, आता कशी आहे प्रकृती?
Chembur Firing
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 10, 2025 | 7:44 AM

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री म्हणजे बुधवारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाला. सदरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीच नाव आहे. सदरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. भरवस्तीत रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या सदरुद्दीन खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. सदरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक गोळी सदरुद्दीन खान यांच्या दाढेत अडकली. येथील झेन रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सदरुद्दीन खान यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन दाढेतून गोळी काढण्याचं ऑपरेशन सुरु होतं.

कशी घडली घटना?

गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असं पोलिसांनी सांगितलं. चेंबूर पोलिसांनी मध्यरात्री फायरिंग झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. सदरुद्दीन खान यांच्यावर ज्या गाडीत फायरिंग झाली, त्या वाहनाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. डायमंड गार्डनच्या सिग्नलवर फायरिंगची घटना घडली. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. फायरिंग झाल्यानंतर चालकाने घाबरून पुढे एक किलोमीटर पर्यंत गाडी पळवली.

‘पोलिस करताय काय?’

खासदार वर्ष गायकवाड यांनी हल्ल्याच्या या घटनेवरुन सरकारवर टीका केली आहे. “साडे नऊला भर वस्तीत हल्ला होतो. अभिनेते सुरक्षित नाही, सैफ अली खान असेल भायखळ्यात खून असेल, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल, पोलिस करताय काय?” असा सवाल त्यांनी केला.