Mumbai : गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स चोरणारे सख्खे पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरु असताना पोलिसांना घाम फुटला

बसमध्ये महिलांच्या पर्स चोरायच्या, एटीएममधून पैसै काढायचे, ऑनलाईन खरेदी करायची, सख्खा भावांना पोलिसांनी बडवलं, मग...

Mumbai : गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स चोरणारे सख्खे पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरु असताना पोलिसांना घाम फुटला
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन आरोपी
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 18, 2023 | 8:57 AM

मुंबई : मुंबईतील (Mumbai Crime News) बेस्ट बसमधून (BEST bus) प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांच्या पर्स चोरून त्यांच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोन चोरट्यांना एमबीबी पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही चोरटे चालत्या बसमध्ये आणि बसस्थानकावर उभ्या असलेल्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स चोरत असल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर ते सख्खे भाऊ असल्याचे समजले. आतापर्यंत त्यांनी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रोकड हस्तगत केली असल्याची माहिती (mumbai police)पोलिसांनी सांगितली.

मीरा रोड परिसरातील महिला बोरिवलीहून बसने प्रवास करत असताना तिची पर्स चोरीला गेली. त्या महिलेच्या पर्समध्ये 16 हजार 500 रोख मोबाइल आणि डेबिट कार्ड होते. चोरट्यांनी डेबिट कार्डच्या मदतीने पैसेही काढून घेतले होते. त्यानंतर महिलेने एमएचबी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सीसीटिव्ही तपासायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना कॅमेऱ्यात दोन आरोपी दिसले, त्यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन आरोपी साजिद अब्दुल खान आणि हमीद अब्दुल खान या दोघांना मालवणी परिसरातून अटक केली. चौकशीत दोघेही सख्खे भाऊ असल्याचे माहिती उजेडात आली.

एमएचबी पोलिसांनी दोघांडी बडवून चौकशी केली असता, त्यांच्याकडे 50 हजारांची रोकड, महिलांच्या 8 पर्स, 5 मोबाईल, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त केले. या दोघांविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात डझनभर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.