Renu Sharma : धनंजय मुंडे यांना धमकावणारी रेणू शर्मा कोण आहे? का मागितली तिनं 5 कोटींची खंडणी?

| Updated on: Apr 21, 2022 | 2:23 PM

Who is Renu Sharma : या महिलेवर अटकेची कारवाई करण्यात आली. आता या महिलेच्या चौकशीतून अनेक ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Renu Sharma : धनंजय मुंडे यांना धमकावणारी रेणू शर्मा कोण आहे? का मागितली तिनं 5 कोटींची खंडणी?
कोण आहे रेणू शर्मा?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आले. त्याआधी एका घरगुती लग्नाच्या वरातीत मनमुराद नाचताना दिसले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. बीडमध्ये (Beed Dhananjay Munde) झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या महिलेची मनधरणी करण्यासाठी थेट मंत्री मुंडे पोहोचले होते. वारंवर या ना त्या कारणामुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. एका महिलेनं त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. या महिलेचं नाव रेणू शर्मा. रेणू शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिस तिची चौकशी करत आहेत. या महिलेनं इंटरनॅशनल कॉल करुन खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. ही महिला नेमकी कोण? (Who is Renu Sharma) हे जाणून घेऊयात…

कोण आहे रेणू शर्मा?

  1. रेणू शर्मा ही सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांची बहीण आहे.
  2. रेणू शर्मा ही मूळची मध्य प्रदेशातील महिला आहे.
  3. मध्य प्रदेशच्या इंदूरमधली ही महिला आहे.
  4. रेणू शर्मा ही गायक असल्याचंही सांगितलं जातं.
  5. देसी लव्ह, बेशरम, फुलों तरह खिलते देखा, मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर ही गाणी रेणू शर्मानं गायली आहे.
  6. टिफाचा बेस्ट प्ले बॅक सिंगर आणि लान्स गोल्ड अवॉर्डही रेणू शर्माला मिळालाय.
  7. 2021मध्ये धनंजय मुंडेविरोधात या महिलेनं बलात्कार केल्याची तक्रार दिली आणि नंतर ही तक्रार मागेही घेतली होती.
  8. रेणू शर्मा या महिलेला मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदूर पोलिसांनी एकत्र कारवाई करत आज (21 एप्रिल) अटक केली.
  9. रेणू शर्मा ब्लॅकमेलर असल्याचा पोलिसांना संशय आहे.
  10. रेणू शर्माविरोधात अनेकांनी ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार पोलिसात केल्या आहेत.
  11. एक पत्र 2021 मध्ये रेणू शर्मानं सोशल मीडियावर टाकलं होतं. त्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता.
  12. माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तुम्हाला बदनाम करेन, अशा आशयाचा मेसेज रेणू शर्मानं केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अटकेनंतर मुंडे काय म्हणाले?

दरम्यान, आता ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. क्राईम ब्रांचकडून तिची चौकशी केली जातेय. या संपूर्ण चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सहनशक्ती संपल्यानंतर मला पोलिसात तक्रार द्यावी लागली, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. आता पुढे जे काही करायचं ते पोलीसच करतील, असंही त्यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडे यांनी मलबार पोलिस स्थानकात या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण मलबार पोलिसांनी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर या महिलेवर अटकेची कारवाई करण्यात आली. आता या महिलेच्या चौकशीतून अनेक ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.