AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘सरक सरक.. तेरे दुकान में घुस के मारुंगा’ चक्क टॉवेलमध्ये आला आणि चाकू घेऊन गावगुंडांचा धिंगाणा!

Dombiwali Crime Video : Dombivali Crime Video : याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी या चंद्या भाईला थेट पोलीस कोठडीत पाहुणचारासाठी नेलं.

Video: 'सरक सरक.. तेरे दुकान में घुस के मारुंगा' चक्क टॉवेलमध्ये आला आणि चाकू घेऊन गावगुंडांचा धिंगाणा!
व्हायरल व्हिडीओनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 6:50 AM
Share

डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivli crime) गावगुंडाचा धिंगाणा कॅमेऱ्यात कैद झालाय. चाकू घेऊन (Knife) एक तरुण दहशत माजवत होता. एका तरुणाला मारण्याच्या हेतूनं हा तरुण चाकू घेऊन धमकावत होता. यावेळी तरुणाचा दहशत माजवणारा व्हिडीओ एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेतली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही संपूर्ण घटना डोंबिवलीच्या शेलार नाका (Shelar Naka Dombivli News) परिरातील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघा तरुणांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलंय. या एक तरुण टॉवेलवर आहे. तशाच अवस्थेत तो हातात चाकू घेऊन दुसऱ्या तरुणाला धमकाव होता. या तरुणाला एक जण रोखण्यासाठी मध्येही पडला होता. त्या तरुणाला उद्देशून ‘सरस सरक.. तेरे दुकान में घुस के मारुंगा’ अशा शब्दांत चाकू हातात घेतलेला तरुण सांगत होता. यावेळी आजूबाजूचे लोकही नेमका काय राडा झालाय, हे पाहण्यासाठी जमले होते. गावगुंडांची धिंगाणा पाहून आजूबाजूच्या लोकांचीही घाबरगु्ंडी उडालेली.

नेमका राडा का झाला?

डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात चंद्या गुलकंद नावाचा 20 वर्षांचा तरुण राहतो. चंद्रकांत गुलालकर असं त्याचं खरं नाव आहे. चंद्रकांत याने परिसरातल्या लोकांशी वाद घालत चाकू घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी या चंद्या भाईला थेट पोलीस कोठडीत पाहुणचारासाठी नेलं. त्याच्यावर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

टॉवेलवरचं गुंडगिरी..

चंद्या गुलकंद हा टॉवेलमध्ये एका तरुणाशी वाद घालताना दिसलाय. त्याला स्थानिक काही तरुण थांबवण्याचा आणि मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. मात्र चंद्या ऐकत नाही. जीवे मारण्याची धमकी देतो. यावेळी आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरल्याचं आवाजांवरुन पाहायला मिळालंय. तर पायऱ्यांवर उभ्या असलेल्या एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा थराराक प्रकार कैद केलाय.

दोन तीन वेळा एकमेकांना आव्हानं देताना या व्हिडीओमध्ये तरुण दिसले आहेत. तर चाकू कुणाला तरी लागेल, या भीतीनं एका महिलेचाही आरडाओरडा यावेळी ऐकू आलाय. शेलार नाका परिसरात एका चाळीत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तो पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत चाकू घेऊन धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडाला अखेर ताब्यात घेतलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.