CCTV VIDEO | रिक्षाच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू, रिक्षाचालकाला अटक

| Updated on: Sep 17, 2021 | 8:22 AM

रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीसमोर अचानक एक रिक्षा आली होती. रिक्षा चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही वृद्धाला रिक्षाच्या मागच्या बाजूचा फटका बसला आणि तो जागीच खाली पडला होता.

CCTV VIDEO | रिक्षाच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू, रिक्षाचालकाला अटक
कांदिवलीत रिक्षाने वृद्धाला धडक दिली होती
Follow us on

मुंबई : कांदिवलीत ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर रिक्षाचालकानेच वृद्धाला उचलून त्याच्या घरी नेले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रिक्षा चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर परिसरात 9 सप्टेंबर रोजी हा अपघात घडला होता. रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीसमोर अचानक एक रिक्षा आली होती. रिक्षा चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही वृद्धाला रिक्षाच्या मागच्या बाजूचा फटका बसला आणि तो जागीच खाली पडला होता.

आठवड्याभरात वृद्धाचा मृत्यू

घटनेनंतर रिक्षाचालकाने वृद्धाला उचलून रिक्षात बसवले आणि त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान 15 सप्टेंबर रोजी वृद्धाचा मृत्यू झाला.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

वृद्धाच्या या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. व्हिडीओमध्ये संबंधित वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. अचानक एक रिक्षा त्याच्या समोरुन जाते. रिक्षा चालक वृद्धाला वाचवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, पण वृद्धाला रिक्षाच्या मागच्या बाजूचा फटका बसतो आणि तो जागीच खाली पडतो.

अपघातानंतर रिक्षा चालकाने वृद्धाला कडेवर उचलून बाजूला नेऊन ठेवले होते. यावेळी रिक्षामध्ये काही प्रवासीही होते. दरम्यान, या वृद्धाच्या मृत्यूनंतर कांदिवली पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

पाहा व्हिडीओ :

रजत बेदीच्या कारच्या धडकेत जखमी पादचाऱ्याचा मृत्यू

याआधी, अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या 39 वर्षीय राजेश रामसिंग दूत याचा मृत्यू झाला होता. कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने मुंबईच्या डी एन नगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 304A अन्वये निष्काळजीपणे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जखमी राजेश रामसिंग दूत याची प्रकृती सुरुवातीपासूनच अत्यंत गंभीर होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तो आयसीयूमध्ये  ऑक्सिजन सपोर्टवर होता. त्याला तातडीने रक्ताची गरज होती.

“माझे पती कामावरून परतत असताना सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच 02 सीडी 4809 ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी राजेशची पत्नी बबिता दुत यांनी यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

मॉर्निंग वॉकला जाताना ट्रकची धडक, महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल