AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेणारा कार चालक सापडला, काही तासांतच अटक

डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कार चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव सोहेल कटुरिया असे असून तो गारमेंटचं दुकान चालवतो. आपण मीडिया प्रतिनिधी असल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.

वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेणारा कार चालक सापडला, काही तासांतच अटक
कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 01, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून नेल्याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईत अंधेरीतील डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला होता. गाडी न थांबवल्याने वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर चढला. तरी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच फरफटत पुढे नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कार चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव सोहेल कटुरिया असे असून तो गारमेंटचं दुकान चालवतो. आपण मीडिया प्रतिनिधी असल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.

नेमकं काय घडलं?

ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबईच्या अंधेरीतील डी. एन. नगर परिसरात घडली. संबंधित वाहतूक कॉन्स्टेबलचे नाव विजय गुरव आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या खाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार तिथे आली. संबंधित कार चालकाने वीरा देसाई रोडकडून जेपी रोडच्या दिशेला उजवे वळण घेतले. पण त्या मार्गावर नो एन्ट्री होती. तरीही कार चालकाने त्या दिशेला गाडी वळवली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गुरव यांनी गाडी चालकाला अडवलं.

पोलिसाला गणेश चौकापर्यंत फरफटत नेलं

पोलिसाने अडवल्यानंतरही कार चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे गुरव यांनी त्याला थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कार चालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. गाडीच्या बोनेटवर पोलीस असतानाही त्याने गाडी पळवली. ती गाडी त्याने आझाद मैदान येथून त्यांना गणेश चौकापर्यंत ओढत नेलं. विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. यावेळी कारचालक पोलिसाला उतरवत पळून गेला.

पाहा व्हिडीओ :

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर पोलीस त्या कारचालकाच्या शोधात होते. या दरम्यान संबंधित गाडी ही जुहू गल्ली येथे आढळली. पोलिसांनी कार आणि कार चालकाला ताब्यात घेतलं. संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ प्रत्यक्षदर्शींनी शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये देखील अशीच घटना समोर आली होती. कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते. विनाकारण फिरणारे आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक विनामास्क बाईकस्वार पोलिसांना येताना दिसला. पोलीस अधिकारी म्हस्के यांनी त्या बाईकस्वाराला थांबविण्याच्या प्रयत्न केला. त्यांना न जुमानता बाईकस्वार म्हस्केंना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला.

या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हातापायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात पोलीस घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाडेघरचा राहणारा आहे. तो पानटपरी चालक आहे. तो विना मास्क फिरत होता. पोलीस त्याची अँटीजेन टेस्ट करणार आहेत. या भीतीने त्याने पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावर फरफटत नेले.

संबंधित बातम्या :

VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना

विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं

VIDEO | कार चालकाची मुजोरी, कारवाईवेळी बीएमसी मार्शलला बोनेटवरुन फरफटत नेलं

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?