विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं

मास्क न घालता नियमाविरोधात रस्त्यावर फिरणाऱ्या एका मुजोर तरुणाने तर सर्व हद्द पार केल्या (youth riding a bike without a mask and attacks on police officer)

विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं
विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं


कल्याण (ठाणे) : विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कल्याणमध्ये कारवाई सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून ही कारवाई सुरु आहे. मात्र, तरीही काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. विशेष म्हणजे मास्क न घालता नियमाविरोधात रस्त्यावर फिरणाऱ्या एका मुजोर तरुणाने तर सर्व हद्द पार केल्या. तो विनामास्क फिरत असल्याने पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के यांनी त्याची बाईक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं. या घटनेत पोलीस अधिकारी म्हस्के गंभीर जखमी झाले आहेत (youth riding a bike without a mask and attacks on police officer).

कल्याणमध्ये आठ ठिकाणी नाकाबंदी

ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली आठ ठिकाणी दररोज नाकाबंदी केली जाते. विनाकारण फिरणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. तसेच त्यांना अँटीजेन टेस्टसाठी पाठविले जात आहे (youth riding a bike without a mask and attacks on police officer).

…आणि बाईकस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते. विनाकारण फिरणारे आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक विनामास्क बाईकस्वार पोलिसांना येताना दिसला. पोलीस अधिकारी म्हस्के यांनी त्या बाईकस्वाराला थांबविण्याच्या प्रयत्न केला. त्यांना न जुमानता बाईकस्वार म्हस्केंना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला.

आरोपी तरुण पानटपरी चालक

या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हातापायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात पोलीस घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाडेघरचा राहणारा आहे. तो पानटपरी चालक आहे. तो विना मास्क फिरत होता. पोलीस त्याची अँटीजेन टेस्ट करणार आहेत. या भीतीने त्याने पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावर फरफटत नेले.

प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी गणोश व्यवहारे यांनी सांगितले की, ही घटना त्यांनी डोळ्यादेखत पाहिली. यात पोलिसांची काही चूक नाही. ते कर्तव्य बजावित असताना हे घडलं. ही घटना पाहून आम्ही काही तरुणांच्या मदतीने जखमी पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयात नेले.

हेही वाचा : कोरोना काळात मुंबईत तब्बल 418 कोटीचा घोटाळा, व्यापारी बापलेकावर गुन्हा दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI