Badlapur VIDEO | महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून ‘पुष्पराज’ला फोडला

बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी निमित्ताने घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा.

Badlapur VIDEO | महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून पुष्पराजला फोडला
महिलांना त्रास देणाऱ्या दुकानदाराला चोप
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 10:11 AM

बदलापूर : दुकानात घुसून महिलांनी दुकानदाराला मारहाण (Beaten up) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात ही घटना घडली. दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉल (Video Call) करुन त्रास द्यायचा, अशी तक्रार समोर आली होती. दुकानदाराच्या घृणास्पद कृत्यांमुळे संतापलेल्या महिलांनी थेट दुकानात हल्लाबोल चढवला. त्यानंतर दुकानदाराला चांगलाच ‘प्रसाद’ दिला. पुष्पराज परिहार असे महिलांचा चोप मिळालेल्या दुकानदाराचं नाव आहे. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी निमित्ताने घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा.

व्हिडीओ कॉल करुन महिलांना त्रास

त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा अशा काही तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराज याला दुकानात जाऊन चोप दिला, तसंच माफी मागायला भाग पाडलं.

विनयभंगाचा गुन्हा, आरोपीला अटक

यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या :

व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन महागात पडले; कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा

सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिरावर गुन्हा, महिलेच्या विनयभंगाचा आरोप

VIDEO | लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं