मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले.

मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं
मुंबई लोकलमधील लूट प्रकरणी एकाला अटक
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:13 PM

कल्याण : लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ बहिणीला चाकूचा धाक दाखवून त्यांची लूट (Mumbai Local Train Loot) करण्यात आली. दोघांकडे असलेला मोबाईल, बॅग (Mobile Theft) खेचून चोरटे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. या चार चोरट्यांपैकी एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोमवारी (काल) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेवरील शहाड रेल्वे स्थानकावर (Shahad Railway Station) हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल दाखल आहेत. गेल्या काही काळापासून आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले.

एका चोरट्याला प्रवाशांनी पकडलं

इतक्यात शहाड रेल्वे स्टेशन आले आणि या चारही तरुणांनी ट्रेनमधून उतरून पळ काढला. दोघा भाऊ बहिणीने आरडाओरड केल्याने स्टेशनवरील प्रवाशांनी सतर्कता दाखवली आणि पळून जाणाऱ्या एका चोरट्याला पकडलं, मात्र त्याचे तिघे साथीदार निसटण्यात यशस्वी ठरले.

या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत.

सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अटक आरोपी संजीव आणि फरार आरोपी छोटू पापा यांच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र रेल्वेत अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

 आई आणि मुलीस बेदम मारहाण करुन दागिने, रोकड घेऊन चोरटे पसार, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

बहिणीची तब्येत बिघडलेय, इमोशनल कारण देत ऑफलाईन OLA बूक, अर्ध्या वाटेत ड्रायव्हरला…

दादा मला एक ‘पल्सर’ आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा