Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! साकिनाका परिसरात भीषण आग भडकल्यानं खळबळ

| Updated on: Oct 25, 2022 | 11:49 AM

साकिनाक्यात नेमकी कुठं आणि कशामुळे लागली आग? आगीत जीवितहानीसह नुकसान किती?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! साकिनाका परिसरात भीषण आग भडकल्यानं खळबळ
मुंबईत अग्नितांडव
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : ऐन दिवाळीत मुंबईच्या (Mumbai Fire News) साकिनाका परिसरात भीषण आग (Sakinaka Fire) लागली होती. मंगळवारी पहाटे ही आग भडकली होती. साकिनाक्यातील आग नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, नंतर आणखी 3 गाड्यांची अतिरीक्त मदत मागवण्यात आली. फायर ब्रिगेडच्या (Fire bridge) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लेव्हल-2 ची आग होती.

साकिनाका खैरानी रोड येथे असलेल्या गोडाऊनमध्ये ही आग उसळली होती. या आगीत तूर्तासतरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. माक्ष गोडाऊनमधील सामानाचं आगीत नुकसान झालं. नेमकी ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

साकिनाका परिसरात लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. सध्या याठिकाणी कुलिंग ऑपरेशन केलं जातंय. नेमकी ही आग कशामुळे लागली, याचाही शोध घेतला जातोय.

राज्यात आगीचं सत्र

दरम्यान, गेल्या 24 तासांत आग लागण्याच्या वेगवेगळ्या घटना महाराष्ट्रात घडल्यात. पालघर जिल्ह्यातील वसईमध्येही एका चप्पल गोडाऊनला आग लागली होती. या आगीतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठं आर्थिक नुकासन झालं. 5 अग्निशमनचे बंब ही आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाले होते.

एकट्या ठाणे जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना समोर आल्यात. फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात आग लागली होती, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलीय. सुदैवानं ठाण्यातील आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, इकडे लोअर परळ आणि गोरेगाव भागातील इमारतींमध्येही आगीच्या घडना सोमवारी नोंदवल्या गेल्या. लोअर परळमधील ए टू झेड औद्यागिक वसाहतीत आग लागली होती. तर गोरेगावमध्ये एका इमारतीच्या घरात आग लागली होती. नेमक्या या आगीच्या घटना कशामुळे घडल्या, याचं कारण कळू शकलेलं नाही. याबाबत अधिक तपास केला जातोय.