Video : ‘तुम मा#%$* कौन है’ महिला पोलिसांच्या अंगावर वकिलानं गाडीच घातली, अरेरावी बघाच!

| Updated on: Sep 28, 2022 | 12:55 PM

तावातावाने आला, पोलिसांच्या ताब्यातली स्कूटी घेऊन जाऊ लागला, त्यानंतर घडली थरारक घटना

Video : तुम मा#%$* कौन है महिला पोलिसांच्या अंगावर वकिलानं गाडीच घातली, अरेरावी बघाच!
झटापटीचा हायव्होल्टेज ड्रामा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पालघर : एका वकिलाने महिला ट्रॅफिक पोलिसांच्या (Lady Traffic Police) अंगावरच गाडी घातली आहे. नालासोपाऱ्यात (Nalasopara) ही घटना घडली.  कर्तव्यावर असलेल्या या महिलेला वकिलाने आपल्या दुचाकीने चिरडण्याचा प्रयत्न केला. यात महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. कसंबसं तिने या वकिलाची दुचाकी रोखली. पण त्यानंतर या वकिलाने उलट कांगावा करत पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस दादागिरी करत असल्याचा आरोप केला. ही सगळी घटना एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Traffic Police Viral Video) झालाय. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केलीय.

मॅटर काय?

ठिकाण नालासोपारा. नो पार्किंमध्ये लावलेली एका होंडा एक्टिव्हा स्कूटी पोलिसांनी उचलली. तिला चौकीत आणलं. ट्रॅफिक पोलिसांनी आपली दुचाकी उचलल्याचं वकिलाच्या लक्षात आलं. त्याने थेट चौकी गाठली. तावातावाने तो आपली गाडी घेऊन पोलिसांच्या चौकीतून निघू लागला.

हे सुद्धा वाचा

नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर पार्क येथील वाहतूक शाखेच्या गोडावून मध्ये वकिलाची ऍक्टिव्हा आणण्यात आली होती. तिथे घुसून हा वकील आपली स्कूटी घेऊन जाण्याच्या प्रयत्न होता.

इतरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वकिलानं कुणाचंही ऐकलं नाही. अखेर महिला पोलिसानं दुचाकीस्वाराला रोखण्यासाठी चौकीचं गेट लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चौकीच्या गेटलाही जोरात धडक दिली आणि नंतर महिला पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली.

पाहा व्हिडीओ :

महिला पोलिसांनं वकिलाला दुचाकीसह रोखण्याचा प्रयत्न केला. त्याची दोन्ही हातानं दुचाकी पकडून ठेवली. पण तिचा तोल गेला. ती खाली पडली, जखमी झाली. पण तिनं वकिलाला काही जाऊ दिलं नाही. या झटापटीत आजूबाजूची लोकंही सरसावली. त्यांनी नंतर या महिला पोलिसाला मदत केली.

बचावासाठी पोलिसांवर दमदाटी

महिला पोलिसाच्या अंगावर गाडी घातली म्हणून जमलेली लोकं वकिलाला दमदाटी करु लागली. त्यानंतर दुचाकी सोडून वकिलाने पोलिसांवर डाफरण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी दादागिरी सुरु केलीय, मला जाणीवपूर्वक टार्गे केलं जातंय, असा आरोप त्याने महिला पोलिसावर केला. तिचा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा केला. यानंतर त्या वकिलाला सगळ्यांनी मिळून पुन्हा चौकीत आणलं.

ब्रिजेशकुमार भेलोरिया असं आरोपी वकिलाचं नाव आहे. तर ज्या महिला ट्रॅफिक पोलिसाला त्याने फरफटवलं तिचं नाव प्रज्ञा दळवी आहे. या झटापटीत प्रज्ञा यांच्या दोन्ही पायाला आणि हाताला गंभीर जखम झालीय.

या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांनी आता वकील ब्रिजेशकुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकही करण्यात आलीय. हा सगळा प्रकरणा सोमवारी घडला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय.