लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी

| Updated on: Sep 20, 2021 | 7:39 PM

नवी मुंबईत सोनसोखळी चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. पण या घटना ताज्या असताना नवी मुंबई पोलिसांना दोन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे.

लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी
लाखो रुपयांच्या दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी
Follow us on

नवी मुंबई : राज्यात सध्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नवी मुंबईतही सोनसोखळी चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. पण या घटना ताज्या असताना नवी मुंबई पोलिसांना दोन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. या चोरट्यांनी तब्बल 18 गुन्हे केल्याचा आरोप पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचे सोने जप्त केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करुन सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे आरोपींना बेड्या ठोकल्याने तब्बल 18 चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 4 लाख 35 हजारांचे सोने तसेच 1 लाख किंमतीची दुचाकी असे एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. तर दुसऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आरोपींचा छळा कसा लावला?

नवी मुंबई पोलीस सोनसाखळी चोरीच्या घटनांचा उलगडा करत होते. त्यासाठी ते शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. यावेळी एकाच आरोपीने तब्बल 6 गुन्हे केल्याचं कॅमेऱ्यात निषपन्न झालं. पोलिसांनी आरोपीचा छळा लावण्यासाठी तापासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी हा गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांचा वाशी टोल नाक्यावर सापळा

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाशी टोलनाक्यावर सापळा रचला. विशेष म्हणजे पोलिसांना या सापळ्यात यश आलं. आरोपी विजय चव्हाण आणि त्याचा अल्पवयीन सहकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी दिपक चव्हाण याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. विशेष म्हणजे हे दोघे आरोपी गेल्या पाच वर्षांपासून चैन स्नॅचिंग करत आहेत. सुरुवातीला ते दोघे अल्पवयीन होते. पण आता एकाचं वय 20 ते दुसऱ्याचे 17 इतके झाले आहे. त्यांचं वय लहान असलं तरी त्यांनी केलेलं कृत्य हे खूप भयानक आणि माफ करण्यासारखे नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्रूत्याचं फळ निश्चितच मिळेल.

नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त जय जाधव, अपर पोलीस आयुक्त महेश धुर्वे, पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम, सहायक पोलीस उप निरीक्षक प्रदीप लिंगाळे, पोलीस नाईक निलेश किंद्रे, शशिकांत जगदाळे, पोलीस हवालदार गणेश कुटे यांनी ही कामगिरी पार पाडली.

हेही वाचा :

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….

चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं