संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

| Updated on: Oct 04, 2021 | 8:33 AM

सतीश मानशिंदे यांनी 2020 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीही (Rhea Chakraborty) बाजू लढवली होती. सतीश मानेशिंदे हे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutt) वकील होते. त्यांनी या दोन्ही केसेस जिंकल्या होत्या. सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणातही मानेशिंदेंनी केस लढवली होती.

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?
Satish Maneshinde Sanjay Dutt Rhea Chakraborty Aryan Khan
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे. कोर्टात आर्यनची बाजू सुप्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) मांडणार आहेत. मानेशिंदेंनी संजय दत्तपासून रिया चक्रवर्ती पर्यंत अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.

कोण आहेत सतीश मानशिंदे?

उल्लेखनीय म्हणजे, सतीश मानशिंदे यांनी 2020 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीही (Rhea Chakraborty) बाजू लढवली होती. सतीश मानेशिंदे हे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutt) वकील होते. त्यांनी या दोन्ही केसेस जिंकल्या होत्या. सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणातही मानेशिंदेंनी केस लढवली होती.

राम जेठमलानींच्या हाताखाली काम

सतीश मनेशिंदे हे मूळचे धारवाडचे रहिवासी आहेत. लॉ ग्रॅज्युएट फ्रेशर म्हणून ते मुंबईत आले होते. 1983 मध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असताना मानेशिंदे यांनी सुप्रसिद्ध क्रिमिनल लॉयर राम जेठमलानी यांच्या अंतर्गत कनिष्ठ वकील म्हणून केले होते. जेठमलानी यांच्यासोबत 10 वर्षांच्या काळात मानेशिंदे यांनी दिवाणी आणि गुन्हेगारी कायद्याची प्रॅक्टिस केली. राजकारणी, अभिनेते आणि इतर सेलिब्रिटींची प्रकरणे त्यांनी हाताळली.

संजय दत्तलाही जामीन मिळवून दिला

सतीश मानेशिंदे हे एक क्रिमिनल लॉयर म्हणून बॉलिवूड सेलिब्रिटी वर्तुळात अतिशय लोकप्रिय नाव आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मानेशिंदे हे संजय दत्तच्या बचाव पक्षाचे वकील होते आणि त्याला जामीन मिळाला होता. 2007 मध्ये संजय दत्तवर अवैध शस्त्र बाळगल्याचा आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असताना संजय दत्तचा बचाव करणाऱ्या कायदेशीर टीमचा ते भाग होते.

रिया चक्रवर्तीसाठीही कोर्टात लढले

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाली होती. तिची बाजूही सतीश मानेशिंदेंनी मांडली होती. “रियाने यापूर्वी मुंबई पोलीस, ईडी यांच्या तपासाला तोंड दिलं आहे, सहकार्य केलं आहे, त्याचप्रमाणे सीबीआयच्या चौकशीलाही ती समोर जायला तयार आहे. तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही” असं रियाचं म्हणणं असल्याचं वकील सतीश मानेशिंदे यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं होतं.

पालघर साधू हत्याकांड

पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणात सतीश मानेशिंदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन साधूंना जमावाने चोर समजून मारले होते. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस मूकपणे उभे असल्याचे दिसल्याचं बोललं जातं.

आर्यनसाठीही युक्तिवाद

मुंबईतील क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला रविवारी मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी आर्यन खानतर्फे वकील सतीश मानेशिंदे यांनी त्याची बाजू मांडली. आर्यनकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला त्या पार्टीचं निमंत्रण आलं होतं. तसेच त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचं ड्रग्ज सापडलं नाही. त्यामुळे दोन दिवसांची कस्टडी न देता एकाच दिवसाची कस्टडी द्यावी, असा युक्तिवाद वकील सतिश मानेशिंदे यांनी कोर्टात केला होता. यानंतर कोर्टाने आर्यनसरह तिघा आरोपींना एक दिवसांची कोठडी सुनावली होती.

संबंधित बातम्या:

‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?