आयआयटी बॉम्बे आत्महत्या प्रकरण, विशेष तपास पथकाचे न्यायालयात धक्कादायक खुलासे

| Updated on: May 31, 2023 | 10:47 AM

बहुचर्चित पवई आयआयटीतील दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी एसआयटी टीमकडून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे आरोपी अरमान खत्रीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आयआयटी बॉम्बे आत्महत्या प्रकरण, विशेष तपास पथकाचे न्यायालयात धक्कादायक खुलासे
पवई आयआयटी आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशभरात गाजलेल्या पवई आयआयटीतील दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दर्शनला अरमान खत्रीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. एसआयटीने हा दावा आणि विविध खुलासे असलेल्या 483 पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहेत. अरमानने दर्शनला ‘बॉम्बे छोडके जाके देखा, मैं वहा पहुचुंगा’, अशी धमकी दिल्याचे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे. या आरोपपत्रात तब्बल 55 साक्षीदारांचा समावेश असून, त्यात दर्शनसोबत शिक्षण घेणाऱ्या 14 सहकारी विद्यार्थ्यांच्या जबाबाचाही समावेश आहे. या आरोपपत्रामुळे अरमान खत्री मोठ्या अडचणीत सापडला आहे.

दर्शनने सहकारी विद्यार्थ्यांकडे व्यक्त केली होती भिती

एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, दर्शन सोलंकी याने आयआयटी बॉम्बेमधील आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना सांगितले होते की, ‘तो कुठेही गेला तरी अरमान खत्री त्याला ठार मारेल’. खत्री याच्या विरोधात केलेल्या कथित जातीय टिप्पणीबद्दल माफी मागून, सोलंकी याने त्याला एक मॅसेज दिला होता, की मी मुंबई सोडत आहे.

काय होते व्हॉट्सअप मॅसेजमध्ये?

याप्रकरणी 14 विद्यार्थ्यांसह 55 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सात प्राध्यापकांचाही समावेश आहे. आरोपपत्रानुसार, 10 फेब्रुवारी रोजी दर्शनने अरमानला व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज पाठवला, “हाय, अरमान मै बॉम्बे छोड़ के जा रहा हू… (मी मुंबई सोडत आहे).” “प्रत्युत्तरादाखल अरमानने त्याला सांगितले, ‘तू बॉम्बे छोड़के जा के देखा, मैं वहॉ पहूचुंगा’.

हे सुद्धा वाचा

दर्शनने सातव्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवले

दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन महिन्यांच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल केले. IIT-Bombay मधील BTech च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने 12 फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. जातिभेदामुळे त्याला स्वतःचा जीव घेण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप केला होता. यानंतर पोलीस तपासात दर्शन त्याचा कॉलेजमधील सिनियर अरमानला घाबरत असल्याचे उघड झाले.