महिला आयोगाला चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी मोठा संशय, आणि तसं असेल तर नीच मानसिकता… महिला आयोगाला कोणता संशय?

नाशिकच्या गंगापुर रोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात महिला आयोगाने मोठा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

महिला आयोगाला चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी मोठा संशय, आणि तसं असेल तर नीच मानसिकता... महिला आयोगाला कोणता संशय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:25 AM

मुंबई : नाशिकच्या गंगापुर रोड पोलिस ठाण्यात एका अज्ञात महिलेवर तीन महिन्याच्या चिमूकलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भूषण रोकडे हे त्यांच्या आईसह पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहतात. त्यामध्ये भूषण हे एका कंपनीत मॅनेजर आहे. ते ड्युटीवर गेले असतांना आई आणि पत्नीसह तीन महिन्याची चिमुकली घरात होती. त्यानंतर आई देखील दूध आणण्यासाठी गेली असतांना घरात एक पंजाबी ड्रेस घालून एक महिला आली आणि तिने महिलेच्या नाकाला गुंगीचे औषध असलेला रुमाल लावला आणि नंतर 3 महिन्याच्या मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची बाब पोलिसांच्या गुन्ह्यावरुन समोर आली होती.

याच घटनेची दखल राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबत सखोल चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेवरुन महिला आयोगाने मोठा संशय व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलंय, नाशिक शहरातील गंगापूर रोड धृवनगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तपास अधिकारी व त्यांची यंत्रणा तत्परतेने तपास करत आहेत ,आयोगाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत .पण एकंदर माहिती घेता केवळ मुलगी आहे म्हणून ही हत्या असू शकते आणि अशी जर नीच मानसिकता असेल तर हि अतिशय दुदैवी घटना आहे.

आरोपींचा तपास आणि योग्य ती कडक कारवाई यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल असं रूपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे. एकूणच कुटुंबातील व्यक्तीनेच ही हत्या केल्याचा संशय महिला आयोगाला असून त्या दृष्टीने आता पोलिसांच्या तपासात काय येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.