AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या हॉटेलात नेऊन विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध… शिक्षिकेच्या कोर्टातील नव्या दाव्याने डोकं गरागरा फिरलं, मोठा ट्विस्ट काय?

मुंबईतील एका नामवंत शाळेत काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली होती. एक 40 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या मुलावर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होती. याबाबत आता या शिक्षिकेने मोठं विधान केले आहे.

बड्या हॉटेलात नेऊन विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध... शिक्षिकेच्या कोर्टातील नव्या दाव्याने डोकं गरागरा फिरलं, मोठा ट्विस्ट काय?
Crime News
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 25, 2025 | 4:51 PM
Share

मुंबईतील एका नामवंत शाळेत काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली होती. एक 40 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या मुलावर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होती. मुंबईतील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर हे अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आरोपी शिक्षिकेने आता नवा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरोपी शिक्षिकेने जामीनासाठी अर्ज केला होता. यावेळी आरोपी महिलेने म्हटले की, मी विद्यार्थ्यासोबत कधीही जबरदस्ती केली नव्हती. उलट तोच या संबंधात राहण्यासाठी हट्टाला पेटला होता. मी त्याला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्नही केला होता असं विधान या शिक्षिकेने जामीन मागताना कोर्टापुढे केले आहे. शिक्षिकेनं सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं शिक्षिकेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

जामीन अर्जात नमूद केल्याप्रमाणे आरोपी शिक्षिकेचे विद्यार्थ्यांसोबत असलेले संबंध एकतर्फी नव्हते हे सिद्ध होतंय, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. तसेच 40 वर्षीय आरोपी महिला ही 11 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई आहे. तिच्या मुलांची घरी काळजी घेण्यासाठी सध्या कुणीही नाही. त्यांच्या शिक्षणाचं देखील नुकसान होतं आहे , तसेच तिच्या एका मुलीला श्वसनाचा आजार असून, तिची विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.

त्याचबरोबर महिलेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. याआधीही एका शाळेची ती शिक्षिका होती, तिथं तिच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. संबंधित शाळेतून तिनं वर्षाच्या सुरुवातीलाच राजीनामा दिलेला आहे. मुंबई पोलिसांनी तिच्याकडून लिहून घेतलेला कबुलीजबाब हा मराठीतून होता, त्यामुळे तिला तो नीट समजला नव्हता. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करत कोर्टानं आरोपी शिक्षिकेला एका हमीदारासह 50 हजारांचा जामीन मंजूर केला आहे.

हा जामीन देताना कोर्टाने काही अटी लादल्या आहेत. या महिलेनं खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी लावावी, कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये, घरचा पत्ता, फोन नंबर कोर्टात जमा करावी. तसेच कोणत्याही प्रकारे संबंधित विद्यार्थ्याशी किंवा त्याच्या पालकांशी संपर्क करू नये. साक्षीपुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, या अटी-शर्थीद्वारे शिक्षिकेला जामीन देण्यात आला आहे. यातील एकाही अटीचा भंग झाल्यास जामीन रद्द होईल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?