जंगलातला बिबट्या शिरला गावातील घरात; बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

बिबट्या घरात शिरल्याची बातमी समजताच पंचक्रोशीतील लोकं जमा झाले. त्यांनी बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न केला. पण, तो घरात आहे. त्याला बाहेर कसे काढायचं असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे.

जंगलातला बिबट्या शिरला गावातील घरात; बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 26, 2023 | 12:30 PM

चंद्रपूर : जिल्ह्यात घरात शिरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनपथकाच्या वतीनं बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. सिंदेवाही शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या कोटा या गावात एका घरात पहाटेच्या दरम्यान बिबट्या शिरला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिकांची बिबट पाहण्याकरिता झुंबड उडाली आहे. सिंदेवाही तालुक्यातील ही घटना. सिंदेवाही तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. कोटा हे असंच जंगलाशेजारी असलेले गाव. या गावातील सर्व लोकं काल रात्री झोपी गेले. जंगली प्राणी गावात येणे हा काही यांच्यासाठी नवा विषय नाही. पण, काल चक्क घरातचं बिबट्या शिरला. आता जोपर्यंत बिबट्या घराबाहेर पडत नाही तोपर्यंत गावच्या लोकांना भीती राहणार आहे. वनविभाग आणि पोलीस त्यासाठी तळ ठोकून बसले आहेत.

बिबट्याला घराबाहेर काढायचं कसं?

कोटा येथील एक व्यक्तीच्या घरी सकाळी बिबट्या दिसला. त्यांची तारांबळ उडाली. तो घरात असल्याने त्याला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न पडला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. पण, काही उपयोग झाला नाही. नंतर वनविभागाला कळवण्यात आले. पोलिसांपर्यंत खबर गेली. त्यामुळे तेही धावतच आले. आता या बिबट्याला घराबाहेर कसं काढायचं असा प्रश्न पडला.

बिबट्याच्या दर्शनासाठी गर्दी पण, तो काही बाहेर पडेना

बिबट्या घरात शिरल्याने घरातील लोकं घराबाहेर पडले. तो केव्हाही व्यक्तीवर हल्ला करू शकतो. ही भीती घरातील लोकांना आहे. घरचे कामधाम सोडून आता हा बिबट्या केव्हा बाहेर पडतो, याची ते प्रतीक्षा करत आहेत. घर कौलारु आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी वरून काही करता येईल का, याचा विचार करत आहेत. बिबट्या घरात शिरल्याची बातमी समजताच पंचक्रोशीतील लोकं जमा झाले. त्यांनी बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न केला. पण, तो घरात आहे. त्याला बाहेर कसे काढायचं असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे. आजूबाजूला नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पण, बिबट्या काही बाहेर निघायला तयार नाही, असे चित्र आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us