Nagpur Crime : कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती महिला, एकटी असल्याचे पाहून नराधमांनी संधी साधली अन्…

नागपूरच्या खापा तालुक्यातील सुरेवानी गावात महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खापा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Crime : कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती महिला, एकटी असल्याचे पाहून नराधमांनी संधी साधली अन्...
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवल सामूहिक अत्याचार
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 20, 2023 | 11:51 PM

नागपूर : नागपुरमध्ये गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघा आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. नागपूरच्या खापा तालुक्यातील सुरेवानी गावात महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खापा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती महिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्याकडे गेले आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागली. मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली

यानंतर देखील हे आरोपी थांबले नाहीत. त्यांनी महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

खापा पोलिसांकडून तिन्ही आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी कारवाई सुरु केली.

पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.