चक्क बस स्थानकातून एसटी बस चोरली! कुणी? कधी? कशी? वाचा सविस्तर

| Updated on: Nov 15, 2022 | 11:54 AM

महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातून चक्क एसटी बस डेपोतूनच चोरीला गेली!

चक्क बस स्थानकातून एसटी बस चोरली! कुणी? कधी? कशी? वाचा सविस्तर
एस बसची चोरी...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलढाणा : चक्क बस डेपोसून एसची बस कशी काय चोरीला जाऊ शकते? असा प्रश्न कुणालाही पडेल. पण असं झालंय खरं! ही घडना बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा (Deulgaon Raja) बस स्थानकात घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चक्क एसटी बसच पळवून नेली असल्याचं समोर आलंय. त्यानंतर संपूर्ण बस स्थानक प्रशासनच हादरुन गेलं. याप्रकरणी पोलिसातही (Buldana Crime News) तक्रार दाखल करण्यात आलीय.

देऊळगाव राजा बस स्थानकात उभी असलेली बस परवा मध्यरात्री कुणीतरी चोरली. मात्र ही बस देऊळगाव राजा ते चिखली मार्गावर आढळून आली. या बसचा ब्रेकवर सेंट्रल जॉईंट तुटला आणि त्यामुळे बस नादुरुस्त झाली.

त्यामुळे बस चोरुन नेणाऱ्याला अखेर बस तिथेच सोडून पळ काढावा लागला. मात्र या एसटी बस चोरीची संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चा रंगलीय.

हे सुद्धा वाचा

परवा रात्री MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस चालक वाहक ड्यूटी संपवून स्थानकात पार्क केली. त्यानंतर ते आपआपल्या दिशेने रवाना झाले. विश्रांती कक्षात विश्रांतीसाठी दोघेही निघून गेले.

त्यानंतर अज्ञाताने बस स्टँड आवारातून ही बस गायब केलीय, अशी तक्रार एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र ही बस अज्ञाताने सुरू करून चिखली रस्त्याने जाताना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गतिरोधकावर तिथेच सोडली.

या बसचा सेंट्रल जॉईंट तुटल्यानं बस बंद पडली आणि त्या व्यक्तीने नादुरुस्त झालेली बस रस्त्यातच उभी केली. आता बस पुढे नेणं शक्य नसल्यानं चोरट्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. या चोरीप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील तपास केला जातोय.

हे प्रकरण सध्या गांभीर्याने घेण्यात आलं असून याची चौकशीही केली जातेय. मात्र याबाबतीत एसटी अधिकारी आणि पोलीस अधिकची काहीही माहिती देण्यास तयार नसल्याचं पाहायाल मिळालंय.