पत्नीच्या चारित्र्यावर बोलल्याने वाद विकोपाला गेला, संतापलेल्या पतीने साथीदाराला यमसदनीच धाडले

अविनाश घुमडे आणि दीपक घनचक्कर दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. दोघेही अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. दोघेही नेहमी सोबतच राहायचे.

पत्नीच्या चारित्र्यावर बोलल्याने वाद विकोपाला गेला, संतापलेल्या पतीने साथीदाराला यमसदनीच धाडले
पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने मित्राला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 09, 2023 | 4:42 PM

नागपूर : पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने साथीदाराला गोळ्या घालत हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली आहे.अविनाश अशोक घुमडे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

आरोपी आणि मयत दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे

अविनाश घुमडे आणि दीपक घनचक्कर दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. दोघेही अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. दोघेही नेहमी सोबतच राहायचे. रविवारी रात्री 11 वाजता नेहमीप्रमाणे दोघेही भेटले होते.

पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने वाद

अविनाशने दीपकच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की दीपकने आपल्या अन्य तीन ते चार साथीदारांसोबत मिळून अविनाशची हत्या केली.

घटेनची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरु केली. गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तपास सुरू केला.

नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हत्येच्या चार घटना

नागपुरात नवीन वर्षाच्या 9 दिवसात चार हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्षात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे.