दोन वाघांच्या झुंजीत एकाने सोडले प्राण; निंबाळा जंगलात नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 27, 2023 | 8:55 AM

दोन वाघ टेरिटरीसाठी झगडले. एकमेकांना जखमी केले. त्यात शेवटी एकाचा मृतदेहच सापडला.

दोन वाघांच्या झुंजीत एकाने सोडले प्राण; निंबाळा जंगलात नेमकं काय घडलं?
Follow us on

चंद्रपूर : ताडोबा जंगलात वाघांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे टेरिटरीसाठी वाघांची भांडणं होत असतात. शिवाय स्वतःचा प्रदेश तयार करण्याची प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. यातून या भांडणात वाद होत असतात. माणूस जसा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतो. तसाच काहीसा प्रकार वाघांच्या बाबतीत दिसून येतो. अशात वाद निर्माण झाल्यास त्यांच्यात लढाई होते. जो जिंकतो तो त्या प्रदेशाचा राजा होता. अशीच एक घटना निंबाळा परिसरातील जंगलात दिसून आली. दोन वाघ टेरिटरीसाठी झगडले. एकमेकांना जखमी केले. त्यात शेवटी एकाचा मृतदेहच सापडला. गेल्या काही दिवसांपासून तो जखमी अवस्थेत फिरत होता. शेवटी त्याचा मृतदेह सापडला.

भांडणात जखमी झाल्याने मृत्यू

मृतक वाघ नर असून त्याचं वय अंदाजे 10 ते 12 वर्ष असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा वाघ 3-4 दिवसांपूर्वी दुसऱ्या एका वाघासोबत झालेल्या झुंजीत गंभीर जखमी झाला होता. वनविभाग या जखमी वाघावर होतं पाळत ठेवून होतं. मात्र काल संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. वाघाचा मृतदेह सध्या चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे ठेवण्यात आला. आज त्याचं पोस्ट मॉर्टम करण्यात येईल. वाघांचे प्रमाण वाढल्याने त्यांना दुसऱ्या जंगलात शिफ्ट केले जात आहे. स्वतःचा वेगळा प्रदेश असता यातून ही भांडण कधी-कधी वाघांमध्ये होत असतात. जंगलातील वाद बरेचदा माहीत होत नाही. पण, वनकर्मचारी प्राण्यांवर पाळत ठेवतात. त्यातून त्यांना जंगलात नेमकं काय सुरू असत ते  कळतं.

घरात शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या कोठा गावात घरात शिरलेली मादी बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. काल पहाटे घराच्या पडक्या भिंतीतून उडी घेत या बिबट्याने घरात बस्तान मांडले होते. ग्रामस्थांनी वनपथकाला माहिती दिल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. संध्याकाळी बिबट्याला एका खोलीत अडकवून ठेवण्यात यश आल्यानंतर अचूक डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले. सुरक्षितरीतीने बिबट्याला पिंजराबंद करत अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले. वनपथक व पोलिसांच्या यशस्वी कामगिरीनंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला.