पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो

| Updated on: Mar 12, 2022 | 9:54 AM

मुलांना गळफास लावलेल्या अवस्थेत आई दिसून आली. हे पाहून मुलांनी हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती वरूड पोलिसांना देण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो
अमरावतीत पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

अमरावती : पोलिस उपनिरीक्षकाच्या (Police Sub Inspector) पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती प्रशिक्षणानिमित्त दोन दिवसांसाठी परगावी गेले असताना विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. अमरावती जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. महिलेने राहत्या घरी गळफास लावून आयुष्याची अखेर केली. गंगा गणपत पुपुलवार असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेचा पती गणपत पुपुलवार अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता.

काय आहे प्रकरण?

पोलिस उपनिरीक्षक गणपत पुपुलवार हे दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी वाशिमला गेले होते. त्यामुळे घरी केवळ त्यांची पत्नी गंगा, 8 वर्षीय मुलगा आणि 4 वर्षीय मुलगी असे तिघेच होते. मुलांना गळफास लावलेल्या अवस्थेत आई दिसून आली. हे पाहून मुलांनी हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती वरूड पोलिसांना देण्यात आली.

चिमुकल्यांचा टाहो

पोलीस उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्या पत्नी गंगा पुपुलवार यांनी आत्महत्या केल्या नंतर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला होता. दरम्यान यावेळी गंगा यांच्या चिमुकल्या मुलांना सांगितलं होतं की आई आजारी पडली. यावेळी आई केव्हा बाहेर येणार , केव्हा तिची प्रकृती सुधारणार असं विचारत चिमुकली मुलं रुग्णालयात आपल्या आईची वाट पाहत होते. मात्र आई बोलत नसल्याने मुलांनी एकच आकांडतांडव केला.

संबंधित बातम्या :

तासभर कुठल्या मुलीशी बोलतोयस? बायकोने रागात मोबाईल फोडला, नवऱ्याची आत्महत्या

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

अपघात झाल्याचा खोटा बहाणा, मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या