नागपूरमध्ये मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार, घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वादाचा भडका, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 06, 2021 | 8:42 AM

राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत. सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना नागूपरमधील यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडलीय.

नागपूरमध्ये मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार, घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वादाचा भडका, नेमकं काय घडलं?
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत. सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना नागूपरमधील यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडलीय. घराबाहेर बसल्याच्या रागातून हत्या करण्यात आलीय. पोलिसांकडून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

नागपुरात हत्या सत्र सुरूच

नागपूरमधील क्राईम रेट काही केल्या थांबत नसल्याचं चित्र असून हत्यासत्र सुरुच आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गुंडाची हत्या करण्यात आली आहे. यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घडली आहे.

हत्या करण्याचं नेमकं कारण काय?

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गुंड जफर अब्बास बरकत अली या व्यक्तीची हत्या करण्यात आलीय. घरासमोर बसल्याच्या कारणावरुन वाद झाला. वादाचं पर्यावसन हत्येत घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी परिसरात जफर अब्बास बरकत अल याचा खून करण्यात आलाय. घरासमोर बसल्याच्या कारण वरून मध्यरात्री वाद झाला. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

इतर बातम्या:

मैत्रिणीचा फेक आयडी बनवून त्रास, संतापलेल्या तरुणांच्या टोळीकडून हत्या, मनमाड रेल्वेस्थानकवर थरार

मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी, नाशकात दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक

बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह

Nagpur crime news murder of person due to seat at outside of house