बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह

मुलगा आपले 53 वर्षीय वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेला, तर मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह
नागपुरात ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:12 PM

नागपूर : वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला गेलेल्या मुलावर भयावह दृश्य पाहण्याची वेळ आली. पोलीस स्टेशनला गेलेल्या मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. ड्रायव्हर म्हणून काम करणारे मुलाचे वडील काही तासांपासून बेपत्ता होते. नागपुरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मुलगा आपले 53 वर्षीय वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेला, तर मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

झाडीझुडपात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

नागपुरातील वाहन चालक अरुण घरडे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. सोमवारी रात्रीपासून ते बेपत्ता झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. नागपूरच्या आऊटर रिंग रोड परिसरातील झाडीझुडपात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

“बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोलनाक्याजवळ हा मृतदेह सापडला. त्याच वेळी एक मुलगा पोलीस स्टेशनला वडील हरवल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याला मृतदेहाचे वर्णन करुन सांगितले असता, तो वडिलांचाच मृतदेह असल्याची ओळख त्याने पटवली. वडिलांना दारु पिण्याची सवय असल्याचं सांगितलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.  त्यामुळे संशयास्पद मृत्यू असल्याने पोलीस हत्येच्या दिशेने तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

दसऱ्याच्या दिवशी एक कोटी 18 लाखांचं ‘सोनं लुटलं’, पुण्यातील चोरटा राजस्थानात जेरबंद

हिडन कॅमेरावर पासवर्ड रेकॉर्ड, पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.