हिडन कॅमेरावर पासवर्ड रेकॉर्ड, पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

चाकण-तळेगाव रोडवर तळेगाव स्टेशनमध्ये जी पी पारसिक सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या शेजारी एटीएम आहे. आरोपी लखवीरसिंग याने एटीएम सेंटरमध्ये घुसून स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

हिडन कॅमेरावर पासवर्ड रेकॉर्ड, पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
पुण्यात एटीएम चोरीचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 8:31 AM

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगाव रोडवर असलेल्या जी पी पारसिक सहकारी बँकेचे एटीएम चोरीच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 25 ऑगस्टला सकाळी सव्वाआठ वाजता घडली होती. पोलिसांनी पंजाबमधील टोळीतील तिघा जणांना जेरबंद केलं आहे. लखवीरसिंग बलदेवसिंग, रमेशकुमार लाजपत्राय चावला, सिंधरसिंग मख्खनसिंग गगू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

चाकण-तळेगाव रोडवर तळेगाव स्टेशनमध्ये जी पी पारसिक सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या शेजारी एटीएम आहे. आरोपी लखवीरसिंग याने एटीएम सेंटरमध्ये घुसून स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दोन साथीदारांनी त्याला मदत केली. हा प्रकार एटीएममधील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चोराला एटीएममध्ये बंद करुन तात्काळ तळेगांव दाभाडे पोलिसांना बोलवलं.

एटीएमबाहेर दोन आरोपी हे पाळत ठेऊन बसले होते. पोलीस घटनास्थळी येताच त्याच्या हालचाली बदलल्या. त्यामुळे पोलिसांनी आधी बाहेरील आरोपींना ताब्यात घेतलं आणि नंतर एटीएममधील आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

काय होती मोडस ऑपरेंडी?

हे आरोपी गुन्हा करताना एटीएम मशीनमध्ये ज्या ठिकाणी गुप्त पासवर्ड टाकण्यात येतो, त्या ठिकाणाच्या वरील बाजूस कॅमेरा, सिमकार्ड आणि मेमरी कार्ड असलेले एक छोटे डिवाइस लावत. हे डिवाईस मोबाईलद्वारे ऑपरेट करत. एटीएम मशीनमध्ये बँकेचे कर्मचारी ज्यावेळेस पैसे भरत असतात, त्यावेळी टाकला जाणारा पासवर्ड संबंधित डिवाइसमध्ये रेकॉर्ड होत होता. मग तो पासवर्ड पाहून हे आरोपी संबंधित एटीएममध्ये चोरी करत असत.

मुख्य सूत्रधार फक्त बारावी पास 

विशेष म्हणजे यातील प्रमुख सूत्रधार हा फक्त बारावी पास असल्याचं देखील समोर आलं आहे. तर याआधी या आरोपींनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये एटीएममधून सात लाख 52 हजार 300 रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या :

बालमित्रांना मृत्यूने एकत्र गाठलं, हिमालयातील दुर्घटनेत डोंबिवलीत दोन वृद्धांचा मृत्यू

शाळकरी मुलांचा खुनी खेळ, भांडणात एकाच्या छातीत सुरा खुपसला, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ठाणे हादरलं

हिरे खोटे असल्याचे समजून फेकून दिले, अटकेनंतर चोरट्यांना खरी किंमत समजली अन्…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.