बालमित्रांना मृत्यूने एकत्र गाठलं, हिमालयातील दुर्घटनेत डोंबिवलीत दोन वृद्धांचा मृत्यू

23 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथील किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात तिघा जणांना प्राण गमवावे लागले. ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण बर्फात गाडले गेले, तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं.

बालमित्रांना मृत्यूने एकत्र गाठलं, हिमालयातील दुर्घटनेत डोंबिवलीत दोन वृद्धांचा मृत्यू
(डावीकडून) अशोक भालेराव आणि राजेंद्र पाठक
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 8:03 AM

डोंबिवली : लहानपणापासून एकत्र खेळलेल्या, फिरलेल्या मित्रांना साठीत मृत्यूनेही एकत्रच गाठलं. हिम दुर्घटनेत ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

हिमाचल प्रदेशात दुर्घटना

23 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथील किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात तिघा जणांना प्राण गमवावे लागले. ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण बर्फात गाडले गेले, तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं. मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकरांचा समावेश आहे.

डोंबिवलीत मित्रांची जोडगोळी

67 वर्षीय राजेंद्र पाठक आणि 66 वर्षीय अशोक भालेराव अशी त्यांची नावे आहेत. दोघे डोंबिवलीचे रहिवासी होते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड होती.

चाळीस वर्षांपासून एकत्र ट्रेकिंग

वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील ही आवड त्यांनी जोपासली होती. जवळपास 40 वर्ष दोघे एकत्र ट्रेकिंग करत होते. मात्र हा हिमालयातील ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला. कारण दोघांनाही मृत्यूने एकत्रच गाठलं.

मागील तीन दिवसापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध लागला का? याकडे डोळे लावून बसले आहेत. संबंधित यंत्रणेला शोध मोहिमेसाठी सरकारने आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी त्यांचे नातेवाईक करत आहेत.

संबंधित बातम्या :

शाळकरी मुलांचा खुनी खेळ, भांडणात एकाच्या छातीत सुरा खुपसला, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ठाणे हादरलं

हिरे खोटे असल्याचे समजून फेकून दिले, अटकेनंतर चोरट्यांना खरी किंमत समजली अन्…

ग्राहकांची दिवाळी, गृहकर्जाचा व्याजदर साडेसहा टक्क्यांच्या खाली

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.