दुपार शांत होती, गल्लीत शुकशुकाट, अचानक घरात धाडssधाडss गोळीबार, आरोपी फरार, नागपूर हादरलं

| Updated on: Feb 24, 2024 | 3:32 PM

नागपुरातील राजनगर परिसरात गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. विनय पुणेकर या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील सदर पोलीस ठाणे हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली आहे.

दुपार शांत होती, गल्लीत शुकशुकाट, अचानक घरात धाडssधाडss गोळीबार, आरोपी फरार, नागपूर हादरलं
Follow us on

गजानन उमाटे, Tv9 प्रतिनिधी, नागपूर | 24 फेब्रुवारी 2024 : नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. नागपुरात भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घुसून अज्ञात आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपीची एवढी हिंमत नेमकी होतेच कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. तसेच आरोपीकडे हत्या करण्यासाठी पिस्तूल आली कशी? असा प्रश्नही उपस्थित होतोय. संबंधित हत्येची घटना नेमकी का घडली? याबाबतही नागपुरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पण हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याचीदेखील माहिती समोर येत आहे.

नागपुरातील राजनगर परिसरात गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. विनय पुणेकर या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील सदर पोलीस ठाणे हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. संशयित आरोपी सीसीटीव्हीत दिसत असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने घरात घुसून विनय पुणेकर यांची हत्या केली आहे. आरोपीने असं कृत्य नेमकं का केलं? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी

विनय पुणेकर हे काही वर्षांपूर्वी प्रेसमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होते. पुणेकरांच्या घराबाहेर आता मोठी गर्दी जमली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जमा झाला आहे. पोलिसांकडून हत्येमागचं कारण शोधलं जात आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. घटनास्थळी डॉक स्कॉर्डला पाचरण करण्यात आलं आहे. संबंधित घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. आरोपी नेमका कोणत्या गाडीतून आला आणि त्याने गोळीबार का केला? याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय.