नागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार

| Updated on: Jun 24, 2021 | 11:13 PM

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात अनेक तथ्य उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Police investigation revealed that Nagpur Man killed five family members was in relationship with sister in law).

नागपूरच्या त्या हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार
नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या
Follow us on

नागपूर : नागपुरात एका तरुणाने कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (20 जून) समोर आली होती. या घटनेमुळे नागपूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सध्या नागपूर पोलिसांकडून सुरु असून आता सर्व पाच मृतकांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात अनेक तथ्य उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Police investigation revealed that Nagpur Man killed five family members was in relationship with sister in law).

पोलीस मृतकांची डीएनए टेस्ट करणार

एका माथेफिरूने स्वतःच्या कुटुंबातील तीन जणांची आणि सासू-मेव्हणी यांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नागपूरात 20 जून रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांना अनेक धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत ज्यातून आरोपी आलोक आणि त्याची मेव्हणी अमिषा यांच्यात अनैतिक संबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांना तपासादरम्यान आणखी काही गोष्टी खटकत असल्याने सर्व मृतकांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे (Police investigation revealed that Nagpur Man killed five family members was in relationship with sister in law).

सर्वात आधी मेव्हणीचा खून

आरोपी आलोक माटूरकर याने सर्वात आधी अत्यंत निर्घृणपणे मेव्हणी अमिषा बोबडे हिचा खून केला. मात्र खून करण्यापूर्वी त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर झालेल्या वादातून त्याने मेव्हणीचा गळा चिरून खून केला.

पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे

पोलिसांनी दोन्ही घटनास्थळावरून चार मोबाईल जप्त केले आहेत ज्यामध्ये आरोपी आलोकने हे भयानक कृत्य करण्यापूर्वी अनेकवेळा यूट्यूबसह इंटरनेटवर क्राईम शो बघितले होते. त्यानंतर त्याच्या वागण्यात आणि बोलण्या चालण्यात फरक दिसून येत होता. एखादा विकृत इसमाप्रमाणे त्याचं वागणं सुरू होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमिषाच्या मोबाईलमध्ये त्या घटनाक्रमाचे संपूर्ण ऑडिओ रेकॉर्डिंग झाले आहे ज्याच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असून अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आधी पत्नी मुलांना संपवलं, मग सासू- मेहुणीची हत्या, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नागपूरच्या हत्याकांडाची ‘रिअल स्टोरी’

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट