Nagpur Murder : आधी पत्नी मुलांना संपवलं, मग सासू- मेहुणीची हत्या, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नागपूरच्या हत्याकांडाची ‘रिअल स्टोरी’

आलोक माटूरकर नावाच्या माथेफिरू इसमाने कुटुंबातील पाच जणांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना तहसील पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.

Nagpur Murder : आधी पत्नी मुलांना संपवलं, मग सासू- मेहुणीची हत्या, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नागपूरच्या हत्याकांडाची 'रिअल स्टोरी'
नागपूर हत्याकांड
सुनील ढगे

| Edited By: सागर जोशी

Jun 21, 2021 | 6:11 PM

नागपूर : उपराजधानी नागपूर हत्याकांडाच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलं आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडलीय. आलोक माटूरकर नावाच्या माथेफिरू इसमाने कुटुंबातील पाच जणांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना तहसील पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे. यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सासू आणि मेहुणीचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागपुरात चांगलीच खडबड माजली आहे. (a man killed five members of his family and committed suicide)

नागपूरच्या टिमकी परिसरात आलोक माटूरकर हा व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसह भाड्याने राहायचा. त्याच परिसरात त्याची सासू आणि मेहुणी सुद्धा राहायची. आलोक हा कपडे शिवून ते विकण्याचा व्यवसाय करायचा. त्यात त्याच्या परिवारातील लोक सुद्धा मदत करायचे. गेल्या काही दिवसांपासून यांच्यात कौटुंबिक कलह सुरू होता. काही महिन्यांपूर्वी आलोकचं मेहुणीसोबत भांडण झाले होतं. त्याबाबतची तक्रारही करण्यात आली होती.

कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याचा अंदाज

नियमित सकाळी उठून कामाला लागणारा हा परिवार आज सकाळी घराबाहेर पडला नाही. दार बंद होतं त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून आत बघितलं असता मुलगा बाहेर मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच समोर आलेलं चित्र भयावह होतं. पत्नी विजया आणि मुलगी परी आतल्या खोलीत मृतावस्थेत पडले होते. तर आलोकने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. पुढील चौकशीसाठी पोलीस आलोकच्या सासूकडे गेले असता त्यांच्या घरात सासू लक्ष्मी बोबडे आणि मेहुणी अमिशा बोबडेही मृतावस्थेत पडलेले पाहायला मिळाले. दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.

नागपूर शहर हादरलं

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरलं आहे. या हत्याकांडामागील कारण कौटुंबिक आहे की अजून काही याचा तपास पोलीस करत आहेत. आलोक सर्वसामान्य परिवारातील होता. त्याच्या सासूची परिस्थितीही साधारणच होती. मग, आलोकने अशाप्रकारचं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय? याचा शोध नागपूर पोलीस करत आहेत. पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या करण्याच्या या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. नागपूरमध्ये अशाच प्रकारची एक घटना जून, 2018 मध्ये दिघोरी परिसरात घडली होती.

इतर बातम्या :

ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या

विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या

a man killed five members of his family and committed suicide

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें