AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले

पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. पण पुराव्या अभावी ते अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत (Pune Police investigation on Shikh family murder case).

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले
मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 11:35 PM
Share

पुणे : पुण्यात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबाच्या करुण अंतावर चर्चा सुरु आहे. पती-पत्नी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा असं अवघं तीन जणांचं हे कुटुंब होतं. पण हे कुटुंब घरातून पिकनिकला गेलं असताना या कुटुंबातील महिला आणि तिच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणजेच मृतक महिलेच्या पतीचाही मृतदेह शुक्रवारी (18 जून) पोलिसांना खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सापडला. या प्रकरणावर पुणे पोलिसांचा तपास सुरु असून या तपासात पोलिसांसमोर अनेक कंगोरे उभे राहिले आहेत. पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. पण पुराव्या अभावी ते अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत (Pune Police investigation on Shikh family murder case).

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात 15 जून रोजी सकाळी सासवड येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेचं नाव आलिया शेख असं आहे. आलिया यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी संध्याकाळी कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ आलिया यांचा आठ वर्षांचा मुलगा अयान शेख याचा मृतदेह आढळला. अयानचा गळा दाबून हत्या करण्यात आली हे देखील पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांनी तपास केला असता ते दोघं आबीद शेख (वय 35) सोबत पिकनिकला कारने घराबाहेर पडले होते. आबीद हा आलियाचा पती आणि अयानचा वडील.

हे कुटुंब पुण्याच्या धानोरी भागात वास्तव्यास होतं. ते कारने पिकनिकला गेले होते. आबीद यांनी पिकनिकसाठी ती कार भाड्याने घेतली होती. पण तीच ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळली. कारने प्रवास करणाऱ्या तीन जणांपैकी दोन जणांचे वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळले. त्यानंतर तिसरा व्यक्ती पुणे-सातारा रोडवर ती गाडी पार्क करतो. तिसरा व्यक्ती म्हणजे आबीद हे तेथील सीसीटीव्हीत कार पार्क करताना दिसत आहेत. त्यानंतर ते स्वारगेटच्या दिशेला पायी जाताना दिसतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण शुक्रवारी आबीद यांचादेखील मृतदेह आढळतो. आबीद यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सापडला. त्यांच्या खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली.

पोलिसांच्या तपासात काही महत्त्वपूर्ण गोष्टी उघड

पोलिसांना आतापर्यंत केलेल्या तपासात काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. शेख दाम्पत्याचा मुलगा अयान याला ऑटिझम हा आजार होता. या मुलाचा सांभाळ करण्यावरुन दोघं पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली. त्याच वादातून आबीद यांनी स्वत:च्या पत्नी आणि मुलाचा खून केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांचा आहे. पण आबीद यांचा मृतदेह खानापूर गावाजवळ सापडला. खानापूर गाव हे हायवेवरील गाव नाही. किंवा त्या गावाच्या दिशेला सतत वाहतूक सुरु नसते. सतत तिथे जायला गाड्याही सापडत नाहीत. मग आबीद तिथे कसे गेले? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर आबीद यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबतही घातपात झाला? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.