आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं

पुणे पोलिसांना सुरुवातीला महिला आणि मुलाच्या हत्येमागे तिचा पती हाच मास्टमाईंड असल्याचा अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी तपासही केला. पण आता पतीचाही मृतदेह आढळल्याने या तीन हत्यांमागील गूढ आणखी वाढलं आहे (Pune Shaikh family murder case after mother and son fathers dead body found at Khanapur).

आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं 'त्या' रात्री? गूढ आणखी वाढलं
आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं 'त्या' रात्री? गूढ आणखी वाढलं

पुणे : पुण्यात एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. एक कुटुंब पिकनिकसाठी घराबाहेर पडलं. या कुटुंबात एक दाम्पत्य आणि त्यांच्या आठ वर्षाच्या लहान मुलाचा समावेश होता. अवघं तीन जणांचं हे कुटुंब सोमवारी (14 जून) कारने पिकनिकला निघालं होतं. मात्र, त्याच रात्री नेमकं असं काही घडलं ज्याने संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. नेमकं त्या रात्री काय घडलं? हे कुणालाही ठाऊक नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे या कुटुंबातील महिलेचा मृतदेह हा सासवड येथे तर तिच्या मुलाचा मृतदेह त्याच दिवशी संध्याकाळी सासवड येथून 35 किमी लांब असलेल्या कात्रज येथे सापडला. या घटनेला दोन दिवस होत नाहीत, तेवढ्यात या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख असलेल्या आणि मृतक महिलेच्या पतीचाही मृतदेह आज खानापूर येथे आढळला आहे. त्यामुळे या घटनेमागील गूढ आणखी वाढलं आहे (Pune Shaikh family murder case after mother and son fathers dead body found at Khanapur).

पुणे पोलिसांना सुरुवातीला महिला आणि मुलाच्या हत्येमागे तिचा पती हाच मास्टमाईंड असल्याचा अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरु केला होता. त्यामागे अगदी कारणही तसंच होतं. कारण हे कुटुंब ब्रिझा कारने पिकनिकला निघालं होतं. पतीने म्हणजे आबीद शेख या 35 वर्षीय इसमाने ती कार भाड्याने घेतली होती. पण ही कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटगृहाबाहेर सापडली. विशेष म्हणजे त्या परिसरातील सीसीटीव्हीत एक व्यक्ती तिथे गाडी पार्क करताना दिसतोय. पण त्याचा चेहरा ठळकपणे दिसत नाहीय. त्यावरुन आबीद यानेच ती कार तिथे पार्क केली, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, आता आबीदचाच मृतदेह आढळल्याने या तीन हत्यांमागील गूढ आणखी गडद झालं आहे (Pune Shaikh family murder case after mother and son fathers dead body found at Khanapur).

आधी महिलेचा मृतदेह

या कुटुंबातील मृतक महिलेचं नाव आलिया शेख असं आहे. तर तिच्या आठ वर्षाच्या मृतक मुलाचं नाव अयान शेख असं आहे. अयानच्या वडिलांनी म्हणजे आबीद शेख यांनी 11 जून रोजी पिकनिलका जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटुंब पुण्याच्या धानोरी भागात वास्तव्यास होतं. ते कारने पिकनिकला गेले होते. पण 15 जूनला म्हणजेच मंगळवारी सकाळी आलिया हिचा मृतदेह सासवड गावात आढळला. आलिया यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आलेला होता.

महिलेपाठोपाठ मुलाचा मृतदेह आढळला

सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचं उघड झालं. त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

कार पुणे-सातारा रस्त्यावर, दोन दिवसांनी पतीचाही मृतदेह

दुसरीकडे, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळली. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. ते पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? आई-मुलाची हत्या का झाली? तसंच आबीद शेख कुठे आहेत? याचा तपास पोलीस करत होते. आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता आबीद यांचाही मृतदेह आढळल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे.

मूळ मध्य प्रदेशातील कुटुंब

आबीद शेख हे मध्य प्रदेशातील विदिशा येथील सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या कुटुंबातील आहेत. त्यांचा भाऊ कॅनडामध्ये स्थायिक आहे. महिलेचे माहेर भोपाळमधील आहे. 2007 मध्ये हे जोडपे पुण्यात आले. त्यानंतर लोहेगावच्या चाऱ्होली येथील फ्लॅटमध्ये ते शिफ्ट झाले. आलिया एका खासगी कंपनीत नोकरी करत होती, पण दोन वर्षांपूर्वी आपल्या मुलाला ऑटिझम असल्याचे निदान जोडप्याला झाल्यानंतर तिने नोकरी सोडली.

संबंधित बातम्या : 

पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान

पुण्याचं कुटुंब पिकनिकला रवाना, सासवडमध्ये आईचा, कात्रजला चिमुकल्याचा मृतदेह सापडला, पती बेपत्ता