AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याचं कुटुंब पिकनिकला रवाना, सासवडमध्ये आईचा, कात्रजला चिमुकल्याचा मृतदेह सापडला, पती बेपत्ता

सासवड गावात तीक्ष्ण हत्याराने वार केलेला महिलेचा मृतदेह काल सकाळी आढळला होता, तर संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह सापडला

पुण्याचं कुटुंब पिकनिकला रवाना, सासवडमध्ये आईचा, कात्रजला चिमुकल्याचा मृतदेह सापडला, पती बेपत्ता
पुण्यात मायलेकाचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळला
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:57 AM
Share

पुणे : पुण्याजवळील सासवडमध्ये काल (मंगळवारी) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालं आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या या कुटुंबातील मायलेकाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आलिया यांचे पती आबीद शेखही गायब असल्यामुळे गुंता वाढला आहे. (Pune Family out for Picnic Mother Son Found Dead Father went missing)

आधी आईचा मृतदेह आढळला

हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे आहे. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं, पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला.

कात्रज बोगद्यालगत मुलाचाही मृतदेह

सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचं उघड झालं.

कार पुणे-सातारा रस्त्यावर सापडली

दुसरीकडे, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचं आढळून आलं आहे. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात. पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? आई-मुलाची हत्या का झाली? तसंच आबीद शेख कुठे आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठेल. मात्र तूर्तास या दुहेरी हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान

फुरसुंगीत कॅनॉलमध्ये पुरुष मृतावस्थेत सापडला, इतक्यात महिलेचाही मृतदेह वाहत आला, पुण्यात खळबळ

(Pune Family out for Picnic Mother Son Found Dead Father went missing)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.