AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुरसुंगीत कॅनॉलमध्ये पुरुष मृतावस्थेत सापडला, इतक्यात महिलेचाही मृतदेह वाहत आला, पुण्यात खळबळ

अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. (Pune Fursungi Canal Dead Bodies)

फुरसुंगीत कॅनॉलमध्ये पुरुष मृतावस्थेत सापडला, इतक्यात महिलेचाही मृतदेह वाहत आला, पुण्यात खळबळ
फुरसुंगी कॅनॉलमध्ये मागोमाग दोन मृतदेह
| Updated on: May 25, 2021 | 1:13 PM
Share

पुणे : अग्निशमन दलाच्या जवानांनी फुरसुंगी गावात असणाऱ्या कॅनोलमधून दोन मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. अग्निशमन दलाच्या जवानांना पुरुषाचा मृतदेह काढत असताना एका महिलेचाही मृतदेह वाहत येताना दिसला. या दोन मृतदेहांचा एकमेकांशी संबंध आहे का, हे अपघात आहेत, आत्महत्या आहे, की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र एकाच दिवशी कॅनॉलमध्ये एकामागून एकन असे दोन मृतदेह सापडल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Fursungi Canal Man Woman Two Dead Bodies Found)

फुरसुंगी कॅनॉलमध्ये पुरुषाचा मृतदेह

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फुरसुंगी गावात कॅनॉलमध्ये मंगळवारी सकाळी दोन मृतदेह सापडले. फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचाही मृतदेह वाहत येताना दिसला

अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनंतर जवानांनी महिलेचा मृतदेहही कॅनॉलमधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

तो मृतदेह शिंदेवाडीतील महिलेचा?

दरम्यान, हडपसर परिसरातील शिंदेवाडी भागात सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. महिलेचा शोध घेतल्यानंतरही रात्री ती कॅनॉलमध्ये सापडली नव्हती. मंगळवारी सकाळी फुरसुंगी भागात पुरुषाचा मृतदेह शोधताना वाहत आलेला मृतदेह त्याच महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात आत्महत्या-हत्यांचं सत्र

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच गेल्या बुधवारी हत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (गेल्या गुरुवारी) याच भागात वॉचमनची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. आठवड्याभरात आत्महत्या-हत्यांच्या पाच वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

संबंधित बातम्या :

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

शहर पुणे, परिसर भारती विद्यापीठ, एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

(Pune Fursungi Canal Man Woman Two Dead Bodies Found)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.