पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान

मयत महिलेचा रंग गोरा असून केस काळे आहेत. मध्यमवयीन असलेल्या महिलेने काळ्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे.

पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान
सांगवी परिसरात महिलेचा मृतदेह आढळला

पिंपरी चिंचवड : पुण्यात नाशिक फाटा पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यमवयीन महिलेची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे. महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Pune Crime Pimpri Chinchwad Nashik Fata Bridge Woman Dead Body Found)

महिलेच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या संबंधित महिलेचा मृतदेह आढळला. मात्र या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सांगवी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.

महिलेचे वर्णन

मयत महिलेचा रंग गोरा असून केस काळे आहेत. मध्यमवयीन असलेल्या महिलेने काळ्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास सांगवी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फुरसुंगी कॅनॉलमध्ये पुरुषाचा मृतदेह

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फुरसुंगी गावात कॅनॉलमध्ये मे महिन्यात दोन मृतदेह सापडले होते. फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचाही मृतदेह वाहत येताना दिसला

अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनंतर जवानांनी महिलेचा मृतदेहही कॅनॉलमधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संबंधित बातम्या :

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

फुरसुंगीत कॅनॉलमध्ये पुरुष मृतावस्थेत सापडला, इतक्यात महिलेचाही मृतदेह वाहत आला, पुण्यात खळबळ

(Pune Crime Pimpri Chinchwad Nashik Fata Bridge Woman Dead Body Found)