Washim Accident : 12 प्रवाशांची मृत्यूला हुलकावणी! थरारक बस अपघातातून थोडक्यात कसे बचावले प्रवासी?

| Updated on: Oct 22, 2022 | 11:14 AM

आणखी एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! खचाखच भरलेल्या बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

Washim Accident : 12 प्रवाशांची मृत्यूला हुलकावणी! थरारक बस अपघातातून थोडक्यात कसे बचावले प्रवासी?
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम : नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस दुर्घटनेनंतर (Nashik Bus Accident) खासगी बस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर राज्यातील खासगी बसच्या (Private Travels Bus) अपघातांची मालिकाही पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता वाशिम (Washim Accident News) जिल्ह्यातील कारंजा शहरात आणखी एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचं बातमी समोर आलीय. या अपघातामुळे बसमधील सर्वच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. एकूण 12 जण या अपघातात जखमी झालेत.

वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात MH 38 F 6899 क्रमांकाची खासगी बस अपघातग्रस्त झाली. नागपूरवरुन परभणीला ही बस जात होती. भरधाव वेगामुळे ही खासगी बस वाटेतच उलटली.

या अपघातात बसमधील एकूण 12 प्रवासी जखमी झाले. त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. वाटेतच बस उलटली असल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

शब्रिज ट्रॅव्हल्स या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती. वाशिम जिल्ह्यातील कारंज शहरातील सावरकर चौकात हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने बसच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली.

पलटी झालेली बस क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं होतं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बसमधील प्रवाशांनी थोडक्यात मृत्यूला हुलकावणी दिली. सध्या पोलिसांनी या अपघातप्रकरणी चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

दिवााळी असल्यानं अनेक जण हे गावाकडे जाण्यासाठी निघालेत. अशा वेळी ट्रॅव्हल्स चालकांकडूनही प्रवाशांची लूट सुरु आहे. तर दुसरीकडे नियमांना केराची टोपली दाखवून खचाखच प्रवासी भरुन खासगी बसमधूल वाहतूक केली जात असल्याचंही दिसून आलंय.