AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणा -कोणाला संधी?

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमदेवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून आपल्या पहिल्या यादीमध्ये 36 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणा -कोणाला संधी?
अजित पवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 8:54 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटानं महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण 36 उमेदवारांचा समावेश आहे.  यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी रिंगणात असणार आहे. तर अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता असून, अजित पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोणाला संधी?

आपल्या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनीष दुबे, सीरील पिटर डिसोझा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, सज्जू मलिक, शोभा रत्नाकर जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोमू पवार, अब्दुल शीद मलिक, चंदन धोंडीराम पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चेट, विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसुफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदणी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता दुबे, लक्ष्मण गायकवाड, सईदा खान, बुशरा मलिक, वासंथी मुरुगेष देवेंद्र, किरण रविंद्र शिंदे आणि फरीन इम्तियाझ खान यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरद पवार गटानं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेल्यानं यातील अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे, त्यातील काही जाणांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवरड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढवणार आहेत.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.