Nagpur : नागपूरमध्ये प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी, परीक्षेत पास करण्याच अमिष

महाराष्ट्रात आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तिने थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

Nagpur : नागपूरमध्ये प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी, परीक्षेत पास करण्याच अमिष
मुंबईहून जम्मू-काश्मीरला निघालेल्या तरुणीचा धावत्या रेल्वेत गळफास
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 7:58 AM

नागपूर – अत्यंत भयानक असा प्रकार नागपूरमध्ये (Nagpur) उघडकीस आला आहे. प्राध्यापकाने शाळेय परिक्षेत (School Exam) पास करतो असं अमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली आहे. ही घटना नागपूर मधील सिंद्धू महाविद्यालयातील आहे. संबंधित विद्यार्थींनीने आपल्या मैत्रीणींसोबत थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापकाचं नाव राकेश गेडाम (Rakesh Gedam) असं आहे. पाचवली (Pachvali) पोलिस स्टेशनमध्ये प्राध्यापक राकेश गेडाम यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आणखी अशी काही प्रकरणं आहेत का ? याचा पोलिस तपास करणार आहेत.

परीक्षेत पास करण्याच अमिष

महाराष्ट्रात आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तिने थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. सध्या मुलांच्या शाळांत परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा संपल्या आहेत. काही दिवसात निकाल जाहीर होईल. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेत परीक्षेत पास करतो असं अमिष दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

तक्रार राज्य महिला आयोगाकडे दाखल

रत्नागिरी लांजातील शालेय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.
शाळेतील मुलीवर मुख्याध्यापकांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. गवाणे केंद्र शाळा क्रमांक 1 मधील धक्कादायक प्रकार आहे. मुख्याध्यापकाविरोधात लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक अद्याप फरार आहे.