नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jul 24, 2023 | 4:15 PM

नाशिकमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ, घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिकमध्ये कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक / 24 जुलै 2023 : नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढले आहे. सिडकोनंतर आता नाशिक रोडच्या विहितगाव परिसरात गुंडांची दहशत पसरवली. काल मध्यरात्री 2 च्या सुमारास काही युवकांनी हातात कोयता मिरवत परिसरातील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

तोडफोड आणि जाळपोळीची घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकमधील विहितगाव परिसरात मध्यरात्री 2 च्या सुमारास हे टोळके परिसरात आले. यो टोळक्याने हातात कोयता घेऊन दहशत पसरवण्यास सुरुवात केली. कोयत्याने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत . यानंतर रामकृष्ण हरी प्राईड इमारतीत घुसुन तेथील गाड्या जाळल्या. सर्व घटना इमारातीतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

सिडको परिसरात 19 वाहनांची तोडफोड

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरात गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने 16 गाड्या फोडल्या होत्या. सिडकोतील त्रिमूर्ती चौक तसेच हेगडेवार चौकात ही तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली.