मालेगावात वाढती गुन्हेगारी, पोलिसांची धडक कारवाई, 10 तलावारींसह चौघांना अटक
आगामी मोहरम आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस गुन्हेगारांवर खास लक्ष ठेऊन आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलीस उप अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालेगावमध्ये 10 तलवारींसह चौघांना अटक केलीय.

रईस शेख, मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी कृत्यं वाढलीत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मालेगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केलीय. आगामी मोहरम आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस गुन्हेगारांवर खास लक्ष ठेऊन आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलीस उप अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालेगावमध्ये 10 तलवारींसह चौघांना अटक केलीय.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिसांनी आमीन मौलाना दर्ग्याच्या पाठीमागे छापा टाकला. संशयितांच्या ताब्यातून 10 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. संशयितांनी या तलवारी विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कुणाकुणाला अटक?
पोलिसांनी अबू तालिब मोहम्मद कुर्बान (वय 22), अन्सारी रिहान अहमद रियाजउद्दीन (19, दोघे रा. रमजानपुरा), मोहम्मद साजिद युनूस खान (20, रा. जैबुन्निसा मशीदसमोर), अब्दुल मुक्तार अब्दुल सत्तार (25, रा. रोलेक्स सायजिंगसमोर) यांना अटक केली.