VIDEO | तलवारीने केक कापण्याची चमकोगिरी महागात, सोलापुरात तरुणावर गुन्हा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथे काही दिवसांपूर्वी गावातील तरुणाने वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

VIDEO | तलवारीने केक कापण्याची चमकोगिरी महागात, सोलापुरात तरुणावर गुन्हा
तलवारीने केक कापणाऱ्या तरुणावर गुन्हा


सोलापूर : तलवारीने बर्थडे केक कापणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोलापुरातील चिंचपूर भागातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली. त्यानंतर मद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथे काही दिवसांपूर्वी गावातील तरुणाने वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्याची शहानिशा करत मद्रुप पोलिसांनी गावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सतीश चोरमुले असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात बर्थडे बॉयला बेड्या

अशाचप्रकारे, सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला काही महिन्यांपूर्वी पुण्यातील गणेश पेठ परिसरात पोलिसांनी अटक केली होती. समीर अनंत ढमाले (27) याने भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

डीजेच्या दणदणाटात तलवारीने केक कटिंग

दुसरीकडे, रोहन बेल्हेकर नावाच्या तरुणाने गेल्या वर्षी धुमधडाक्यात डीजेच्या दणदणाटात वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस करताना तलवारीसारख्या घातक हत्याराचा वापर केला आणि गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, म्हणून पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI