बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून वैभवने बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्यानंतर तलवारीने केक कापत त्याने उन्मादाचं प्रदर्शन केलं

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन
साताऱ्यात गुंडाचं तलवारीने केक कटिंग

सातारा : गाडीच्या बोनेटवर बसून गुंडाने तलवारीने केक कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्ह्यातील चंदन नगर येथील गुंड वैभव जाधवने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून वैभवने बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्यानंतर तलवारीने केक कापत त्याने उन्मादाचं प्रदर्शन केलं. यावेळी जोरजोरात गाणी लावून गुंडाच्या 15 ते 20 मित्रांनी रस्त्यावर नाच केल्याचा प्रकारही घडला.

वैभव जाधववर वेगवेगळे गुन्हे

‘मरने से मै कभी डरता नहीं, बादशाह ओ बादशाह’ या गाण्यावर जल्लोष करत तलवारीने केक कापतानाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित वैभव जाधव हा सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. सातारा शहरात वैभव जाधववर याआधी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

पुण्यात बर्थडे बॉयला बेड्या

अशाचप्रकारे, सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला काही महिन्यांपूर्वी पुण्यातील गणेश पेठ परिसरात पोलिसांनी अटक केली होती. समीर अनंत ढमाले (27) याने भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

डीजेच्या दणदणाटात तलवारीने केक कटिंग

दुसरीकडे, रोहन बेल्हेकर नावाच्या तरुणाने गेल्या वर्षी धुमधडाक्यात डीजेच्या दणदणाटात वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस करताना तलवारीसारख्या घातक हत्याराचा वापर केला आणि गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, म्हणून पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या

(Satara Goon Vaibhav Jadhav detained for Cake Cutting by Sword on birthday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI