सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता.

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक
Pune Cake Cutting By Sword

पुणे : सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे (Pune Cake Cutting By Sword). पुण्यातील गणेश पेठ परिसरात हा प्रकार घडला. समीर अनंत ढमाले (27) याने भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे (Pune Cake Cutting By Sword).

पुणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी कारवाई करत समीर ढमालेला अटक केली आहे. त्याच्याकडून 26 इंच लांबीचे दुधारी पाते आणि 200 रुपये किमतीची 6 लांबा नक्षीदार मुठ असलेली पौराणिक तलवार हस्तगत करण्यात आलेली आहे. समीर अनंत ढमाले राहणारा गणेश पेठ लोणकर वाडा याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे शहरामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी पुणे शहर पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, फरार आरोपी आणि तडीपार असलेले गुन्हेगार यांचा शोध घेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

Pune Cake Cutting By Sword

संबंधित बातम्या :

भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा

Viral Video | भारताच्या नकाशाच्या आकाराचा केक, त्यावर छोटा राजनचा फोटो, भाईचा बड्डे म्हणत समर्थकांकडून जल्लोष

Published On - 11:26 am, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI