तोतया खेळाडूला बेड्या; नाशिकच्या संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र घेत मिळवली नोकरी

| Updated on: Sep 25, 2021 | 1:00 PM

नाशिकच्या (Nashik) जिल्हा संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र (bogus certificate) घेऊन सरकारी नोकरी मिळविलेल्या तोतया खेळाडूला (fake player) पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रभाकर धोंडिबा गाडेकर असे त्या भामट्याचे नाव आहे.

तोतया खेळाडूला बेड्या; नाशिकच्या संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र घेत मिळवली नोकरी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिकः नाशिकच्या (Nashik) जिल्हा संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र (bogus certificate) घेऊन सरकारी नोकरी मिळविलेल्या तोतया खेळाडूला (fake player) पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रभाकर धोंडिबा गाडेकर असे त्या भामट्याचे नाव आहे. (Police arrested a fake player after getting a bogus certificate in the name of Nashik District Association)

शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी अनेकजण गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या प्रभाकर गाडेकरने सेपकटकरा खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. या प्रमाणपत्राच्या जोरावर त्याने अहमदनगरच्या शासकीय कोषागारामध्ये 2019 मध्ये नोकरी मिळवली होती. त्याला पुण्यातील हिंडवडी येथे अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा संघात खेळल्याचे बोकग प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी क्रीडा आरक्षणाचा लाभ उठवल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे कैफियत मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे कारवाई करण्यात आली आहे.

सेपकटकराचे नाशिकमध्ये पाचच खेळाडू

नाशिकच्या सेपकटकरा जिल्हा संघात फक्त पाच खेळाडू गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे आपल्या संघाचे दुसरे कोणीतरी प्रमाणपत्र मिळवून नोकरीवर लागल्याचे खेळाडूंना समजले होते. हा बोगस प्रमाणपत्राचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रीडा आयुक्तांच्या कानावर हा प्रकार घातला होता. सेपकटकरा सारखे इतर अनेक दुर्लक्षित क्रीडा प्रकार आहेत. त्यामध्येही असे बोगस प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी नोकरी पटकावल्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्येही चौघे अटकेत

बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटमधील चौघांना नुकत्याच औरंगाबादमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ट्रंपोलिन आणि टंबलिंन या खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याचे प्रमाणपत्र या चौघांनी दिले होते. आरोपींमध्ये क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर, निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रेय महादवाड, पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून शंकर श्यामराव पतंगे आणि एजंट अंकुश प्रल्हाद राठोड यांचा समावेश आहे.

बोगस रहिवासी दाखवले

औरंगााबादमध्ये अटक केलेले राठोड आणि पतंगे क्रीडा संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या मैत्री निर्माण झाली होती. त्यांची महादवाड आणि वीर यांच्यासोबतही मैत्री होती. यातल्या राठोड आणि पतंगेने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्राबाहेरील तरुणांना पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी या तरुणांना औरंगाबादचे रहिवासी असल्याचे दाखविण्यात आले आहे.

राज्यभर रॅकेट सक्रिय

औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या चौकडीने राज्यभरातील अनेकांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याची शक्यता आहे. त्या तरुणांनी सरकारी नोकरीच्या आशेपायी ही उठाठेव केली. त्यासाठी हजारो रुपये मोजले. आता एकेक प्रकरण बाहेर निघत आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आता अटकेतील आरोपींकडून कुणाकुणाला बोगस प्रमाणपत्र दिले याची नावे मिळाली, तर त्या प्रमाणपत्राचा कोणी, कुठे आणि कसा वापर केला हे उघडकीस येऊ शकते. (Police arrested a fake player after getting a bogus certificate in the name of Nashik District Association)

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

नाशिककरांना मिळणार नवी घरे; जुन्या इमारतींचा होणार पुनर्विकास, नगरविकास खाते राजी