वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, रुग्णालयातील गर्दी पाहूण डॉक्टर म्हणाले…

लग्नाच्या गाडीचे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या गाड्याच्या अपघाताला चालक जबाबदार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, रुग्णालयातील गर्दी पाहूण डॉक्टर म्हणाले...
goti hospital
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 22, 2023 | 8:55 AM

नाशिक : इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील भावली परिसरामध्ये (bhavali area) वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला आहे. वळणावरती चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन पलटी झाला आहे. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती महिला असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील काही व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये (ghoti hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी लोकांनी वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात झाला असल्याची माहिती लोकांना लागली, त्यावेळी रुग्णालयात इतकी गर्दी झाली होती की, डॉक्टर सुध्दा घामाघूम झाले होते.

अख्खं वऱ्हाड वळणाला गाडीतून बाहेर पडलं

लग्नाच्या गाडीचे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या गाड्याच्या अपघाताला चालक जबाबदार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मध्यतंरी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो सुध्दा पिकअप गाडीचा होता. त्यामध्ये अख्खं वऱ्हाड वळणाला गाडीतून बाहेर पडलं होतं. तसाचं प्रकार काल घटला आहे. जखमी असलेल्या व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. तर काही लोकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

एका महिलेचा मृत्यू

ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, त्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. जखमी असलेल्या लोकांनामध्ये अनेकांना धक्का बसला आहे. इकडची-तिकडची पाहुणी त्या पिकअपमध्ये असल्याची माहिती सुध्दा मिळाली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करणार आहेत.