पोलिसांसमोरच बजरंग वाडीत दोन गटांत तूफान राडा; पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ, राडा कशावरून?

पोलिसांच्या समोरच दोन गटात तूफान राडा झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी दुसरीकडे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पोलिसांसमोरच बजरंग वाडीत दोन गटांत तूफान राडा; पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ, राडा कशावरून?
संशयातून भावाने भावाला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Mar 18, 2023 | 8:10 AM

नाशिक : नाशिक शहरातील बजरंग वाडी येथे दोन गटात तूफान राडा ( Crime News ) झाला आहे. यावरून मुंबई नाका पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना बुधवारी रात्री घडली असून यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. महादेव मंदिराजवळ झालेल्या या दोन गटातील हाणामारीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई नाका पोलिसांत ( Nashik Police ) पोलिसांच्या फिर्यादीवरुण दंगलीसह जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसमोर झालेल्या राड्यात कोयत्याने वार आणि दगडेफक करत एकमेकांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. त्यामूळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

बजरंग वाडीत आपलाच दबदबा आहे. आपली दहशत असायला हवी म्हणून दोन गटात नेहमीच कुरघोडी सुरू होती. मात्र बुधवारी त्यावरून थेट दंगलच झालीय. मंगेश जाधव आणि संकेत तोरवणे यांच्या गटात वर्चस्व वादावरून हा राडा झाला आहे.

मंगेश वर संकेतच्या गटाने जोरदार हल्ला चढवला होता. त्यात तो जखमी झाला आहे. त्यामध्ये पोलिसांच्या तक्रारीवरुन चेतन जाधव, अभिषेक ब्राम्हणे, मोणू शर्मा यांच्यासह त्यांच्या गटाने ही मारहाण केली होती.

त्यानंतर लागलीच मंगेशच्या गटाने संकेतच्या गटावर हल्ला केला होता. याच दरम्यान उपस्थित असलेल्या पोलिसांनी गर्दी पांगवण्यास सुरुवात केली होती. मात्र दोन्ही बाजूने दगडफेक केली. याच दरम्यान संकेतच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. त्यामध्ये संकेतसह विशाल गाढवे जखमी झाला आहे.

जखमी झालेले दोन्ही तरुण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या तूफान राड्यात परिसरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच वेळी पोलिसांनी संशयित आरोपीना पकडून जवळपास 27 जणांवर गुहा दाखल केला आहे.