जुन्या भांडणातून आधी कोयत्याने वार, नंतर गोळीबार; असा घडला थरार

| Updated on: Mar 12, 2023 | 11:03 AM

जुन्या वादातून थेट एका घरात घुसून महिलेवर आणि तिच्या मुलावर कोयत्याने हल्ला केला. तसेच गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

जुन्या भांडणातून आधी कोयत्याने वार, नंतर गोळीबार; असा घडला थरार
Follow us on

नाशिक : जुन्या वादाच्या कुरापतीवरून एका जणावर हल्ला करत घरावर गोळीबार केला. ही घटना नाशिकच्या फुलेनगर भागात समोर आली आहे. या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे. नाशिकच्या फुलेनगर परिसरात जुन्या वादातून थेट एका घरात घुसून महिलेवर आणि तिच्या मुलावर कोयत्याने हल्ला केला. तसेच गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारमध्ये महिलेच्या अंगाला गोळी लागल्याने ती जखमी झाली आहे. उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण फायरिंगची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

कोयत्याचा वार पाहून पळ काढला

शनिवारी रात्रीच्या सुमारास फुलेनगर परिसारत दयानंद महाले यांचा मुलगा हा चौकात बसलेला होता. जुन्या भांडणाच्या कुरपतीवरून येथे 7-8 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यात त्याने हा वार हुकून घराकडे पळ काढला. एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांनी थेट महाले यांच्या घरावर हल्ला करत गोळीबार केला. तर जाब विचारण्यासाठी आलेल्या उषा महाले यांच्या दिशेने देखील हल्लेखोरांनी बंदुकीतून फायरिंग केली. आरोपींच्या हातात कोयते दिसत आहेत. एक जण तर गोळीबार करत आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

हे सुद्धा वाचा

महिला गोळीबारात जखमी

सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून ही गोळी गेल्याने त्या यात बचावल्या आहे. जवळ जवळ चार राउंड फायर केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून ही माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मागच्याच आठवड्यात दिवसा ढवळ्या भर रस्त्यात एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ती घटना ताजी असताना, पुन्हा एकदा फुलेनगर भागात ही गोळीबारची घटना समोर आली आहे. अश्या घटनांनी नाशिककर नागरिक हे भीतीच्या सावटा खाली आहे आहेत. धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख ही कुठेतरी गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे.