लेट पण थेट! पोलिसांनी ‘त्या’ सहा जणांना शिकवली कायमची अद्दल, पोलिसांच्या कारवाई गुन्हेगारांचे धाबे दणाणले…

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत भर दिवसा झालेल्या सिनेस्टाइल हल्ल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

लेट पण थेट! पोलिसांनी 'त्या' सहा जणांना शिकवली कायमची अद्दल, पोलिसांच्या कारवाई गुन्हेगारांचे धाबे दणाणले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 5:31 PM

नाशिक : नाशिकच्या सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कार्बन नाका परिसरात भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. यामध्ये समोरील गाडीला धडक देत हल्ला केला होता. ही संपूर्ण घटना खरंतर चित्रपटाला लाजवेल अशी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातपुर येथील हल्ल्याची घटना चर्चेचा विषय ठरली होती. संशयित आरोपी हे अनेक दिवस फरार असल्याने पोलिसांना चकवा देत होते. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर वर्चस्व वादातून हल्ला झाल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली होती. त्यानंतर नाशिकच्या शहर पोलिसांनी तपास करत असतांना त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांनी संशयित आरोपींना चांगलाच दणका दिला आहे.

नाशिक शहर पोलिसांनी सहा जणांवर मोक्काची कारवाई केली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कलमान्वये ही कारवाई करण्यात आल्याने शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. बहुचर्चित हल्ल्यातील आरोपींवर थेट मोक्काची कारवाई केली आहे.

यामध्ये आशिष राजेंद्र जाधव, भूषण किसन पवार, रोहित मंगलदास अहिरराव, गणेश राजेंद्र जाधव, किरण दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ झांजर यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यातील बहुतांश जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा

मार्च महिन्यातील 19 तारखेला पूर्ववैमनस्यातून संशयित आरोपींनी गाडी चालवत असतांना कार्बन नाका परिसरात तपन जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. त्याबाबत सोबत असलेल्या राहुल पवार याने फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सातपुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी ही करवाई केली आहे. यामध्ये लेट पण थेट मोक्काचीच कारवाई झाल्याने नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना दिलेल्या दणक्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक शहरात पंचवटी नंतर सातपुर आणि लागलीच अंबड परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर नाशिक शहरात पोलिस काय करताय असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.