वृद्ध महिला पाहून दोघांनी पाय पडला, पोलिस असल्याची बतावणी करून घातला गंडा, प्रकरण ऐकून पोलिस देखील चक्रावले…

| Updated on: Apr 01, 2023 | 7:54 AM

पोलिस असल्याची बतावणी करत एका वृद्ध महिलेला गंडा घातल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. समोर आलेली बाब पाहून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा चक्रावून गेले आहे.

वृद्ध महिला पाहून दोघांनी पाय पडला, पोलिस असल्याची बतावणी करून घातला गंडा, प्रकरण ऐकून पोलिस देखील चक्रावले...
डोंबिवलीत 24 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : चोरी करण्यासाठी चोर नवनवीन शक्कल लढवत असतात. त्यात अनेकदा त्या चोरीची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होते. नाशिक मध्ये अशीच एक चोरीची घटना घडली आहे. पोलिस असल्याची बतावणी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याच दरम्यान जे काही घडलंय ते ऐकून पोलिस सुद्धा चक्रावून गेले आहे. विमल काशिनाथ मुंडे या महिलेचे चोरटे पाच तोळे सोनं घेऊन चोरटे पसार झाले आहे. काही क्षणात घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. याबाबत वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे ही घटना घडली आहे. विमल काशीनाथ मुंडे या महिला मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन घराच्या दिशेने जात असतांना हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे महिलेचे घर तिथून हाकेच्या अंतरावर असतांना ही घटना घडली आहे.

विमल मुंडे या वृद्ध महिलेच्या अंगावर जवळपास पाच तोळेच्या वर दागिने होते. लाखो रुपयांचे हे दागिने काही क्षणात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून महिलेची लूट केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडत असलेल्या वृद्ध महिलेच्या समोर दोघे जण आले. आजी नमस्कार करू द्या म्हणत दोघांनी आजीच्या पायावर डोकं ठेवलं. आजीच्या अंगावर कुप सोनं असल्याचे लक्षात येताच त्यांनी आज्जीला सांगितलं, आम्ही पोलिस आहोत.

त्याचवेळी पोलिस असल्याचे सांगत असतांना आमचे मोठे साहेब येणार आहेत. पण त्यांच्यासमोर इतकं सोनं घालून नका राहू. तुम्ही एक काम करा ते आमच्याकडे द्या ते गेले की आम्ही तुम्हाला तुमचं सोनं देतो. असं म्हणत चोरट्यांना विश्वास संपादन करण्यात यश आले.

आज्जीने कुठलाही विचार न करता जितकं सोनं काढता येईल तितकं सोनं काढून चोरट्यांच्या हातात दिलं. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे सोनं हातात पडताच चोरट्यांनी आज्जीला चकवा दिला आणि बाजूला होऊन गेले.

आज्जीच्या निदर्शनास पोलिस असल्याची बतावणी करणारे दोघे पळल्याचे लक्षात आल्याने आज्जी जवळच असलेले आपलं घरं गाठलं. घराच्या खाली त्यांचे मेडिकल आहे. तिथे जाऊन त्यांनी संपूर्ण हकीगत सांगितली. आज्जीच्या घरच्या मंडळीनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.